Watch Anuj Rawat: चित्याची चपळाई अन् घारीची नजर! अनूजच्या ‘रॉकेट थ्रो’ ने पृथ्वी शॉला दाखवली परतीची वाट - VIDEO

Prithvi Shaw Run Out Video: या धावांचा पाठलाग करण्यासाठी दिल्लीला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. पृथ्वी शॉ शून्यावर माघारी परतला.
anuj rawat
anuj rawatsaam tv
Published On

RCB VS DC LIVE UPDATES: बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना सुरु आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने प्रथम फलंदाजी करताना १७४ धावा केल्या आहेत. दरम्यान या धावांचा पाठलाग करण्यासाठी दिल्लीला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. पृथ्वी शॉ शून्यावर माघारी परतला. (Anuj Rawat)

anuj rawat
RCB VS DC IPL 2023: RCB ची ताकद दुपटीने वाढली! २ दिग्गज खेळाडूंचे संघात जोरदार कमबॅक

अनुज रावतचा रॉकेट थ्रो..

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने दिलेल्या १७५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला चांगल्या सुरुवातीची गरज होती. मात्र पृथ्वी शॉ एकही धाव न करता माघारी परतला. तर झाले असे की, मोहम्मद सिराजने षटकातील चौथा चेंडू टाकला.

या चेंडूवर पृथ्वी शॉने कव्हरच्या दिशेने शॉट खेळत एक धाव घेण्याच्या प्रयत्न केला. मात्र त्याच ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असलेल्या अनुज रावतने वाऱ्याच्या वेगाने चेंडू उचलला आणि फिरून हिट मारला. पृथ्वी शॉ क्रीझमध्ये पोहोचणार इतक्यात त्याने हिट मारून दांडी उडवली होती. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest sports updates)

दिल्लीला जिंकण्यासाठी १७५ धावांचेआव्हान ..

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ गडी बाद १७४ धावा केल्या आहेत. या सामन्यात माजी कर्णधार विराट कोहलीची बॅट चांगलीच तळपली. विराटने सलामीला फलंदाजीला येऊन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला चांगली सुरुवात करून दिली.

त्याने ३४ चेंडूंचा सामना करत ६ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५० धावांची खेळी केली आहे. तर महिपाल लोमरोरने २६ आणि ग्लेन मॅक्सवेलने २४ धावांचे योगदान दिले. शेवटी अनुज रावत आणि शाहबाज अहमदने महत्वपूर्ण खेळी केली.

अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू :

विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, वेन पारनेल, मोहम्मद सिराज, विजयकुमार विशाक

दिल्ली कॅपिटल्स:

डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), मिचेल मार्श, यश धुल, मनीष पांडे, अक्षर पटेल, अमन हकीम खान, ललित यादव, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, मुस्तफिझूर रहमान

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com