Tushar Deshpande Twitter
Sports

Tushar Deshpande Engagement: झाला रे झाला..तुषारचा शाळेतल्या मैत्रिणीशी साखरपुडा झाला..- PHOTO

Shivam Dube Instagram Story: चेन्नईच्या आणखी एक शिलेदाराने गुपचुप साखरपुडा उरकला आहे.

Ankush Dhavre

Tushar Deshpande: काही दिवसांपुर्वीच चेन्नईचा शिलेदार ऋतुराज गायकवाड विवाह बंधनात अडकला होता. त्याच्या विवाहाची जोरदार चर्चा रंगली होती. आता चेन्नईच्या आणखी एक शिलेदाराने गुपचुप साखरपुडा उरकला आहे. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

चेन्नईला पाचवे जेतेपद मिळवुन देण्यात तुषार देशपांडेने मोलाचे योगदान दिले आहे. या स्पर्धेत त्याने भल्या भल्या फलंदाजांची दांडी उडवली होती. आता तो स्वत:च क्लीन बोल्ड झाला आहे. सोमवारी त्याने साखरपुडा उरकल्याची माहिती समोर आली आहे. (Tushar Deshpande Engagement Photos)

शिवम दुबेच्या पोस्टने चर्चेला उधाण..

या सोहळ्याला मोजक्याच खेळाडूंनी हजेरी लावल्याचे समोर येत आहे. हा सोहळा पार पडल्यानंतर शिवम दुबेने आपल्या इंस्टाग्राम अकांउटवर स्टोरी शेअर केली होती. शिवम दुबे आणि तुषार देशपांडे या दोघांनी चेन्नई सुपर किंग्ज संघाला जेतेपद मिळवुन देण्यात मोलाचे योगदान दिले होते. तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये हे दोघेही मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे हे दोघेही खुप चांगले मित्र आहेत. शिवम दुबेची स्टोरी व्हायरल झाल्यानंतर तुषार देशपांडेचा साखरपुडा झाल्याचं उघड झालं आहे. (Latest sports updates)

कोण आहे तुषार देशपांडेची होणारी लाईफ पार्टनर?

नाभा गद्दमवार असं तुषार देशपांडेच्या होणाऱ्या लाईफ पार्टनरचं नाव आहे. तुषारने साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत पोस्ट केली आहे.

यावेळी त्याने नाभा ही त्याची शाळेपासूनची क्रश होती आणि आता ती त्याची लाईफ पार्टनर बनली आहे, असं म्हटलंय.

आयपीएल २०२३ स्पर्धेत दमदार कामगिरी..

आयपीएल २०२३ स्पर्धेत तुषार देशपांडेने दमदार कामगिरी केली आहे. एमएस धोनीने दिलेली जबाबदारी त्याने योग्यरित्या पार पाडली आहे. त्याने या स्पर्धेतील १६ सामन्यांमध्ये २१ गडी बाद केले आहेत. यादरम्यान ४५ धावा करत ३ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT