lsg vs mi
lsg vs mi  twitter
क्रीडा | IPL

LSG vs MI Turning Points: इथंच लखनऊच्या हातून मॅच सुटली... हा VIDEO बघून मुंबईच्या विजयाचा प्रत्येक क्षण अनुभवता येणार

Ankush Dhavre

IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धा आता रोमांचक वळणावर पोहोचली आहे. या स्पर्धेतील एलिमिनेटरचा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला.

या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने जोरदार कामगिरी करत लखनऊ सुपर जायंट्स संघावर ८१ धावांनी विजय मिळवला आहे. ५ विकेट्स घेणारा आकाश मधवाल या सामन्याचा हिरो ठरला आहे. दरम्यान सामन्यात काही टर्निंग पॉईंट्स देखील आले होते. जिथे सामना मुंबईच्या दिशेने फिरला.

इथे फिरला सामना..

मुंबई इंडियन्स संघ कमबॅक करण्यासाठी ओळखला जातो. या संघाने अनेकदा कठीण परिस्थितीतून बाहेर येत विजय मिळवला आहे. लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात देखील असेच काहीसे चित्र पाहायला मिळाले आहे. या सामन्यात मुंबईने गोलंदाजीसह क्षेत्ररक्षणात देखील उल्लेखनीय कामगिरी केली. ज्यामुळे मुंबईला हा सामना जिंकता आला.

या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाला विजय मिळवण्यासाठी १८३ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाला घातक फलंदाज मार्कस स्टोइनीस कडून भिती होती.

तो आक्रमक पवित्रा स्वीकारणार, त्यापूर्वीच टीम डेव्हिडच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणामुळे त्याला पॅव्हेलियनची वाट धारावी लागली. तर झाले असे की, मुंबई इंडियन्स संघाची गोलंदाजी सुरु असताना कॅमेरून ग्रीन गोलंदाजी करण्यासाठी आला होता. त्यावेळी मार्कस स्टोइनीस ३९ धावांवर फलंदाजी करत होता.

ग्रीनने टाकलेल्या चेंडूवर मार्कस स्टोइनिसने लेग साईडच्या दिशेने शॉट मारला. या चेंडूवर त्याने दोन धावा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा प्रयत्न फसला. कारण दीपक हुड्डा धक्का लागल्याने आणि टीम डेव्हिडच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणामुळे तो धावबाद होऊन माघारी परतला. (Latest sports updates)

टीम डेव्हिडचं अप्रतिम क्षेत्ररक्षण..

लखनऊ सुपर जायंट्स संघाची फलंदाजी सुरु असताना पियुष चावला १३ वे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर कृष्णप्पा गौतमने ऑफ साईडच्या दिशेने शॉट मारला.

जो कॅमेरून ग्रीनने डाइव्ह मारत अडवला. त्यावेळी रोहित शर्माने चपळता दाखवत डायरेक्त्ट हिट मारला आणि कृष्णप्पा गौतमला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. हे या सामन्याचे टर्निंग पॉईंट्स ठरले.

मुंबई इंडियन्स संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ८ गडी बाद १८२ धावा केल्या होत्या. मुंबई इंडियन्स संघाकडून कॅमेरून ग्रीनने ४१ धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादवने ३३ धावांचे योगदान दिले.

या धावांचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून मार्कस स्टोइनीसने सर्वाधिक ४० धावंची खेळी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News : Raigad Voting : धाटाव येथे मतदानयंत्रात तांत्रिक बिघाड; ४५ मिनिटांनी मतदान पुन्हा सुरू

Baramati Lok Sabha: मतदानादरम्यान सुप्रिया सुळे पोहोचल्या अजित पवारांच्या घरी, कुटुंबीयांच्या भेटीनंतर काय म्हणाल्या?

Boycott Election : बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार; प्रांताधिकाऱ्यांची बैठक असफल

Air Cooler Precautions : कुलर वापरताना 'ही' काळजी घ्या; अन्यथा तुमच्यावरही ओढावू शकतं संकट

Narayan Rane: मी सर्वात हुशार विद्यार्थी, अभ्यास करूनच पेपरला बसतो; नारायण राणे काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT