team india saam tv news
Sports

IND vs AUS, U-19 WC Final: फक्त एक चेंडू... टीम इंडियाच्या पराभवासाठी नेमका कोणता ठरला टर्निंग पॉईंट?

India vs Australia, Turning Point: अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्कारावा लागला आहे. कोणता एक चेंडू या सामन्यातील टर्निंग पॉईंट ठरला, जाणून घ्या.

Ankush Dhavre

India U-19 vs Australia U-19 Turning Point:

ऑस्ट्रेलियाचा संघ पुन्हा एकदा भारतीय संघाला वर्ल्डकपच्या फायनलमध्ये नडला आहे. यापूर्वी २०२३ मध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीतही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. आता अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही भारतीय संघाला पराभव पत्कारावा लागला आहे. (IND U-19 vs AUS U-19 Final)

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २५३ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव अवघ्या १७४ धावांवर आटोपला. आव्हान मोठं नव्हतं आणि भारतीय संघाचा फॉर्म पाहता हे आव्हान भारतीय संघ सहजरीत्या पूर्ण करेल असं वाटलं होतं. मात्र या सामन्यात भारतीय संघाकडून नेमकी काय चूक झाली आणि काय होता सामन्यातील टर्निंग पॉइंट? जाणून घ्या. (Uday Saharan Wicket)

या संपूर्ण स्पर्धेत जेव्हा जेव्हा भारतीय संघ अडचणीत होता त्यावेळी कर्णधार उदय सहारन भिंतीसारखा उभा राहिला. या सामन्यातही अशीच काहीशी परिस्थिती होती. संघाला उदय सहारनच्या खेळीची गरज होती. कारण संघातील प्रमुख फलंदाज मुशीर खान २२ आणि अर्शिन कुलकर्णी ३ धावा करत माघारी परतले. त्यानंतर संघाची संपूर्ण जबाबदारी उदय सहारनवर होती. (Cricket news in marathi)

उदयने संपूर्ण स्पर्धेत दमदार खेळ केला. त्याच्या नावे शतक झळकावण्याचीही नोंद आहे. मात्र अंतिम सामन्यात तो अवघ्या ८ धावा करत माघारी परतला. त्याला माहील बेयर्डमनने पॅव्हेलियनची वाट दाखवली. हाच या सामन्यातील टर्निंग पॉईंट ठरला.

भारतीय संघाने सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत दमदार खेळ केला. स्पर्धेची फायनल गाठणाऱ्या भारतीय संघाने एकही सामना गमावला नव्हता. भारतीय संघाने एकापेक्षा एक बलाढ्य संघांना हरवलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday : कर्कच्या कामाचे कौतुक! धनु राशीच्या इच्छा पूर्ण होणार! पाहा, तुमचे राशिभविष्य

Anant Chaturdashi 2025 live updates : नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

SCROLL FOR NEXT