भारतीय अंडर १९ संघाने अंडर १९ वर्ल्डकप २०२४ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. संघाचा कर्णधार उदय सहारन या सामन्याचा हिरो ठरला आहे. त्याने सचिन धससोबत मिळून १७१ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. यादरम्यान उदय सहारनने ८१ तर सचिन धसने ९६ धावांची खेळी केली. दरम्यान सामना झाल्यानंतर कर्णधार उदय सहारन मोठं वक्तव्य केलं आहे.
सामना झाल्यानंतर बोलताना उदय सहारन म्हणाला की, ' स्पर्धेची फायनल गाठणं हा आमच्यासाठी सुखद अनुभव आहे. आम्हाला अटीतटीच्या लढतीचा अनुभव देखील मिळाला आहे, हे अंतिम सामन्यात नक्कीच आमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आम्ही ड्रेसिंग रूममधील जल्लोष कधीच कमी होऊ देत नाही. आम्ही निर्माण केलेलं वातावरण आणि कोच दोघेही शानदार आहेत.'
उदयने ८१ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर तो म्हणाला की, ' हो, एक वेळी अशी होती जेव्हा आम्ही या सामन्यात पिछाडीवर होतो. मात्र आमच्यात चर्चा सुरू होती की, आम्हाला माहीत होतं की, आम्हाला शेवटपर्यंत फलंदाजी करायची आहे. आम्हाला केवळ एका भागीदारीची गरज होती.' (Cricket news in marathi)
तसेच तो पुढे म्हणाला की, ' जेव्हा मी फलंदाजी करण्यासाठी आलो त्यावेळी चेंडू हवेत स्विंग होत होता आणि उसळीही घेत होता. मात्र त्यानंतर चेंडू बॅॅटवर चांगल्याप्रकारे येऊ लागला.
तसेच दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार नुआन जेम्स म्हणाला की, ' ज्यावेळी ते दोघे फलंदाजी करत होते त्यावेळी ४ फलंदाजांना माघारी धाडलं होतं. उदय आणि सचिनने खरचं चांगली फलंदाजी केली. त्यांची भागीदारी तोडण्यासाठी आम्ही संघर्ष केला मात्र माघार घेतली नाही.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.