trent boult  twitter
Sports

Trent Boult Catch: आपल्याच चेंडूवर बोल्टने 'गरुडझेप' घेत पकडला भन्नाट झेल, पाहा VIDEO

Best Catches Of IPL 2023: आपल्याच गोलंदाजीवर ट्रेंट बोल्टने एक भन्नाट झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

PBKS VS RR, IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेतील ६६ वा सामना पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा सामना दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा होता. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने जोरदार कामगिरी करत ४ गडी राखून विजय मिळवला.

या विजयासह पंजाब किंग्ज संघ सलग नवव्यांदा आयपीएल स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये पोहचण्यात अपयशी ठरला आहे.

तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्स संघाच्या आशा अजूनही जिवंत आहेत. दरम्यान आपल्याच गोलंदाजीवर ट्रेंट बोल्टने एक भन्नाट झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

आपल्याच गोलंदाजीवर बोल्टचा भन्नाट झेल...

तर झाले असे की, राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून पंजाब किंग्ज संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. पंजाब किंग्ज संघाकडून शिखर धवन आणि प्रभसिमरन सिंग यांची जोडी मैदानात आली होती.

मात्र ही जोडी फार काळ काही टिकू शकली नाही. ट्रेंट बोल्टने पहिल्याच पाणा फिरवत पंजाब संघाचे नट बोल्ड ढिले केले.

स्ट्राईकवर असलेल्या प्रभसिमरन सिंगला ट्रेंट बोल्टने अचूक टप्प्यावर चेंडू टाकला. जो टप्पा पडून आत आला. या चेंडूला प्रभसिमरन सिंगने हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा प्रयत्न फसला.

कारण चेंडू बॅटला लागून थेट गोलंदाजी करत असलेल्या ट्रेंट बोल्टच्या हातात गेला. मात्र हा झेल सोपा मुळीच नव्हता. डाव्या हाताचा गोलंदाज ट्रेंट बोल्टने उजव्या दिशेने डाईव्ह मारत हा झेल टिपला. (Latest sports updates)

राजस्थानचा जोरदार विजय..

या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्ज संघाने ५ गडी बाद १८७ धावा केल्या होत्या. पंजाब किंग्ज संघाकडून सॅम करनने नाबाद ४९ धावांची खेळी केली.

तर जितेश शर्माने ४४ धावांचे योगदान दिले. शेवटी शाहरुख खानने नाबाद ४४ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर पंजाबने ५ गडी बाद १८७ धावा केल्या होत्या.

या धावांचा पाठलाग करताना देवदत्त पडीक्कलने सर्वाधिक ५१ धावांचे योगदान दिले. तर यशस्वी जयस्वाल या सामन्यातही चमकला. त्याने ३६ चेंडूंचा सामना करत ५० धावा केल्या. शेवटी शिमरोन हेटमायरने ४६ धावा करत आव्हान गाठले. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने ४ गडी राखून विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jyeshtha Gauri Avahan 2025: ज्येष्ठा गौरी आवाहन कधी आहे? पूजा आणि मुहूर्त जाणून घ्या

Maharashtra Live News Update: हवामान खात्याच्या येल्लो अलर्टनंतर नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पाऊस

Suger-Free Modak Recipe: साखरेशिवाय बनवा स्वादिष्ट मोदक, जाणून घ्या सोपी रेसिपी

गणपतीसाठी गावी निघालेलं कुटुंब अचानक बेपत्ता, ४० तासांनी सापडलं, समोर आल्यानंतर त्यांनी घटनाक्रमच सांगितला | VIDEO

Janhvi Kapoor: जान्हवी कपूर लाल साडीत खुललं सौंदर्य, फोटोंवर लागल्या नजरा

SCROLL FOR NEXT