mohammed siraj and ravindra jadeja twitter
Sports

Year Ender: २०२३ मध्ये भारतीय गोलंदाज चमकले! टॉप ५ गोलंदाजांच्या यादीत ३ भारतीयांचा समावेश

Most Wickets In 2023: फलंदाजांसह गोलंदाजांनीही भारतीय संघाच्या विजयात मोलाचं योगदान. दरम्यान कोण राहिले सर्वाधिक गडी बाद करणारे ५ गोलंदाज? जाणून घ्या.

Ankush Dhavre

Year Ender, Top 5 Most Wicket Takers In 2023:

हे वर्ष संपायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. यावर्षी क्रिकेटविश्वात अनेक मोठ मोठे रेकॉर्डस केले गेले. फलंदाजांसह गोलंदाजांनीही भारतीय संघाच्या विजयात मोलाचं योगदान. दरम्यान कोण राहिले सर्वाधिक गडी बाद करणारे ५ गोलंदाज? जाणून घ्या.

रविंद्र जडेजा

यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रविंद्र जडेजाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत रविंद्र जडेजा अव्वल स्थानी आहे.

जडेजाने यावर्षी खेळलेल्या ३५ सामन्यांमध्ये ६६ गडी बाद केले आहेत. यादरम्यान त्याची सरासरी २३.७४ इतकी राहिली आहे. जडेजाने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतही भारतीय संघासाठी मोलाची भूमिका बजावली होती.

कुलदीप यादव

या यादीत भारतीय फिरकीपटू कुलदीप यादव दुसऱ्या स्थानी आहे. कुलदीपला भारतीय संघाकडून ३९ सामने खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यांमध्ये त्याने ६३ गडी बाद केले आहेत. भारत- ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये झालेल्या टी-२० मालिकेत या गोलंदाजाने मालिकावीराचा पुरस्कारही पटकावला होता. (Latest sports updates)

मिचेल स्टार्क

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. स्टार्कला यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अवघे २३ सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने ६३ गडी बाद केले आहेत. यादरम्यान त्याची सरासरी २९.७७ इतकी राहिली आहे.

शाहीन आफ्रिदी

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी या यादीत चौथ्या स्थानी आहे. शाहीन आफ्रिदीने ३० सामन्यांमध्ये २७.८० च्या सरासरीने गोलंदाजी करताना ६२ गडी बाद केले आहेत.

मोहम्मद सिराज या यादीत भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज पाचव्या स्थानी आहे. मोहम्मद सिराजसाठी देखील हे वर्ष चांगलं राहिलं आहे. त्याने ३४ सामन्यांमध्ये २३.७८ च्या सरासरीने ६० गडी बाद केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT