बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा निवडणूक प्रचारात; मतदारांना ‘या’ पक्षाला मतदानाचं आवाहन|VIDEO

Govinda Election Campaign In Phaltan: फलटण नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात बॉलिवूड अभिनेता गोविंदा सहभागी झाले. शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या समर्थनार्थ काढलेल्या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला.

फलटण नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिकेतराजे नाईक निंबाळकर आणि सर्व नगरसेवकांच्या प्रचारासाठी आज अभिनेता गोविंदा यांची रॅली फलटण शहरात काढण्यात आली. या रॅलीला फलटणकरांनी मोठा प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळालं. यावेळी माध्यमांशी बोलताना गोविंदा यांनी मराठीतून संवाद साधत सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

तसंच मी या दिलेल्या शुभेच्छांना कोणताही दोष लागू नये असं सुद्धा गोविंदा म्हणाले. अनिकेत राजे यांच्या कामातून लोकांचे विचार पूर्णपणे बदलून जातील असं काम त्यांनी करावं असं सुद्धा ते म्हणाले. वाईट बोलणारी लोक नेहमीच दिसत असतात. त्यामुळे मी विरोधकांनी केलेल्या टिकेकडे पाहत नाही. चित्रपट स्थापना, रुद्र स्थापना याला महाराष्ट्राची भूमी पुढे आणते. या महाराष्ट्राच्या भूमीला मी सतत नमन करत असतो. बाळासाहेबांच्या कृपेने आम्ही पुढे आलेलो आहोत. आमच्यावर त्यांची ही कृपा सदैव राहील असे मत सुद्धा अभिनेता गोविंदा यांनी व्यक्त केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com