team india twitter
क्रीडा

IND vs BAN 2nd Test: अश्विनची फिरकी ते जयस्वालचं आक्रमण! हे आहेत टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयाचे ५ शिल्पकार

Ankush Dhavre

Top 5 Heroes Of Team India Victory: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने बांगलादेशवर ७ गडी राखून शानदार विजय मिळवला.

या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंकडून शानदार कामगिरी पाहायला मिळाली. गोलंदाजी करताना आर अश्विन, रविंद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांनी धारदार गोलंदाजी केली. तर फलंदाजीत यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल आणि केएल राहुल यांनी शानदार फलंदाजी केली. दरम्यान कोण आहेत, भारताच्या विजयाचे ५ शिल्पकार? जाणून घ्या.

आर अश्विन

भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू आर अश्विन या सामन्यातही चमकला. त्याने चेन्नई कसोटीत फलंदाजी करताना शतकी खेळी केली होती. तर गोलंदाजी करताना त्याने ६ गडी बाद केले होते. त्यानंतर कानपूर कसोटीत त्याने ५ गडी बाद केले. कानपूर कसोटीत त्याला केवळ पहिल्या डावात फलंदाजी करण्याची संधी मिळाली. या डावात तो लवकर माघारी परतला. तर गोलंदाजीत त्याने महत्वाच्या विकेट्स काढून दिल्या.

रविंद्र जडेजा

रविंद्र जडेजाने देखील बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार कामगिरी केली. त्याने गोलंदाजीसह फलंदाजीतही मोलाचं योगदान दिलं. या मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना त्याने ९ गडी बाद केले आणि फलंदाजी करताना ९४ धावा केल्या. त्याने चेन्नई कसोटीतील पहिल्या सामन्यात आर अश्विनसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली होती. या डावात त्याने ८६ धावांची खेळी केली होती.

यशस्वी जयस्वाल

यशस्वी जयस्वाल कानपूर कसोटीत भारतीय संघाच्या विजयाचा हिरो ठरला आहे. त्याने या सामन्यात फलंदाजी करताना दोन्ही डावात अर्धशतकं झळकावली आहेत. जयस्वाल हा या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने या मालिकेत १८९ धावा केल्या. यादरम्यान त्याने ३ अर्धशतकं झळकावली. दुसऱ्या कसोटीतील २ अर्धशतकांसह त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली आहे.

जसप्रीत बुमराह

जसप्रीत बुमराह हा भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज आहे. जेव्हा जेव्हा भारतीय संघाला गरज असते, तेव्हा जसप्रीत बुमराह गोलंदाजीला येऊन विकेट्स काढून देतो. त्याने या मालिकेतील दोन्ही २ सामन्यांमध्ये ११ गडी बाद केले. यादरम्यान त्याने २.८७ च्या इकोनॉमीने धावा खर्चे केल्या.

शुभमन गिल आणि रिषभ पंत

या मालिकेत रिषभ पंत आणि शुभमन गिल यांनी देखील संघाला गरज असताना महत्वपूर्ण धावा केल्या. गिलने या मालिकेत फलंदाजी करताना ५४.६६ च्या सरासरीने १६४ धावा केल्या. तर रिषभ पंतने ५३.६६ च्या सरासरीने १६१ धावा केल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MVA seat Sharing : मविआत मित्रपक्षांची 40 जागांची मागणी? कोणत्या पक्षाला कुठली जागा हवीय?

Marathi News Live Updates : करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची बांधण्यात आली पहिली सालंकृत पूजा

Badlapur BJP Meeting News : भाजपच्या बैठकीत गोंधळ, आमदार आणि माजी खासदारांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? VIDEO

Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्ते निवडणुकीच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंना देणार तगडी फाइट

Operation Blunder : ती एक चूक जीने काँग्रेसला नवसंजीवनी दिली; काय आहे ‘ऑपरेशन ब्लंडर'? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT