best catches in ind vs eng 2nd test twitter
क्रीडा

IND vs ENG 2nd Test: भारत- इंग्लंड दुसऱ्या कसोटीतील जबरदस्त ५ कॅचेस! Video पाहून तुम्हीच ठरवा कोणती आवडली?

Ankush Dhavre

Top 5 Best Catches In IND vs ENG 2nd Test:

भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टनमच्या मैदानावर पार पडला. भारतीय संघाने हा सामना जिंकण्यासाठी ३९९ धावांचं आव्हान ठेवलं होतं.

या धावांचा पाठलाग करतान इंग्लंडने जोरदार प्रत्युत्तर दिलं. मात्र इंग्लंडला हा सामना १०६ धावांमी गमवावा लागला आहे. दरम्यान या सामन्यात एकापेक्षा एक भन्नाट झेल पाहायला मिळाले आहेत. ज्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

रोहित शर्मा

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने ओली पोपला बाद करण्यासाठी भन्नाट झेल टिपला. तर झाले असे की, २९ वे षटक टाकण्यासाठी आर अश्विन गोलंदाजीला आला होता. या षटकातील दुसराच चेंडू त्याने ऑफ स्टंपच्या लाईनवर टाकला. या चेंडूवर ओली पोपने कट शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू बॅटचा कडा घेत स्लिपमध्ये असलेल्या रोहित शर्माच्या हातात गेला.

बेन स्टोक्स

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने मागच्या दिशेने धावत श्रेयस अय्यरचा भन्नाट झेल टिपला. तर झाले असे की, इंग्लंडकडुन २८ वे षटक टाकण्यासाठी टॉम हार्टले गोलंदाजीला आला होता.

या षटकातील पहिल्याच चेंडूवर श्रेयस अय्यरने २२ मीटर मागच्या दिशेने धावत डाईव्ह मारत झेल टिपला. या डावात अय्यर केवळ २९ धावा करत माघारी परतला. (Cricket news in marathi)

श्रेयस अय्यर

तर झाले असे की, भारतीय संघाची गोलंदाजी सुरु असताना २३ वे षटक टाकण्यासाठी अक्षर पटेल गोलंदाजीला आला होता. त्यावेळी इंग्लंडचा फलंदाज झॅक क्रॉली फेव्हिकॉलसारखा चिपकून होता.

या षटकातील तिसऱ्या चेंडूवर झॅक क्रॉलीने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू हवेत गेला आणि श्रेयस अयरने मागच्या दिशेने धावत डाईव्ह मारत झेल टीपला.

केएस भरत

इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी ३९९ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडकडून बेन डकेट आणि झॅक क्रॉली ५० धावांची सलामी दिली. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना आर अश्विनने ही जोडी फोडली. अश्विनचा चेंडू डकेटने डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चेंडू बॅटची कडा घेत हवेत गेला. यष्टीरक्षण करत असलेल्या भरतने पुढे डाईव्ह मारत झेल टिपला.

बेन फोक्स

बेन फोक्सने आर अश्विनला बाद करण्यासाठी उत्कृष्ट झेल टिपला. सामन्यातील ७९ व्या षटकात रेहान अहमदने टाकलेला चेंडू आर अश्विनने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्त केला. हा चेंडू खालीच राहिला. मात्र चेंडू बॅटची कडा घेत त्याच्या ग्लोमध्ये गेला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT