tokyo paralympics 2020
tokyo paralympics 2020 
क्रीडा | IPL

Paralympics : १९ पदकांवर माेहाेर उमटविणारे हे आहेत चॅम्पियन्स

वृत्तसंस्था

टाेकियाे : येथे झालेल्या ऑलिंपिक olympics स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अत्युच्च कामगिरी केली हाेती. त्याच प्रेरणेने टाेकियाेताच सुरु असलेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत tokyo paralympics 2020 विविध क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडूंनी indian palyers उल्लेखनीय कामगिरी करीत देशात पाच सुवर्ण, आठ राैप्य आणि सहा अशा एकूण १९ पदकांवर माेहाेर उमटवली. एकूण १६२ राष्ट्रांपैकी भारत एकूण पदक तालिकेत २४ व्या स्थानावर आहे.

पॅरालिंपिक स्पर्धेसाठी भारताने आतापर्यंतची सर्वोच्च ५४ खेळाडूंची तुकडी नऊ क्रीडा प्रकारांसाठी स्पर्धेस पाठवली हाेती. बॅडमिंटन आणि तायक्वांदाे क्रीडा प्रकाराने टोकियोत स्पर्धेत पदार्पण केले. या दोन्ही स्पर्धांचे प्रतिनिधित्व भारताकडून झाले. त्यात यशही लाभले.

येथे स्पर्धा सुरु झाल्यानंतर टेबल टेनिस क्रीडा प्रकारात भाविना पटेल हिने राैप्यपदक जिंकून देशाच्या पदकतालिकेचे खाते उघडले. त्यानंतर एकेक खेळाडूंनी उत्तम कामगिरी करीत पदकांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न केला. काहींना यश आले तर काही जणांची थाेडक्यात निराशा झाली. या स्पर्धेत भारतीय संघाने पाच सुवर्ण, आठ रौप्य आणि सहा कांस्य पदकासह एकूण १९ पदके जिंकून देशावासियांची वाहवा मिळवली आहे.

सुवर्ण पदक विजेते खेळाडू

नेमबाजी : अवनी लेखरा, जागतिक विक्रमाची बरोबरी करीत R2 महिलांच्या १० मीटर एअर रायफल SH1 क्रीडा प्रकारात सुवर्ण.

मनिष नरवाल पुरुष गटात मिश्र P4 ५० मीटर पिस्टल SH 1 क्रीडा प्रकारात सुवर्ण.

भालाफेक : सुमीत अंतिल पुरुष गटातील F64 क्रीडा प्रकारात विश्वविक्रमासह सुवर्ण.

बॅडमिंटन : प्रमोद भगत पुरुष गटात एकेरीतील SL 3 क्रीडा प्रकारात सुवर्ण.

कृष्णा नागर पुरुष गटातील एकेरीतील SH 6 क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक.

राैप्य पदक विजेते खेळाडू

टेबल टेनिस : भाविना पटेल.

नेमबाजी : सिंहराज अधाना.

बॅडमिंटन : सुहास यथिराज.

अॅथलेटिक्स

उंच उडी : निशाद कुमार, मरिय्यपन थंगवलु, प्रवीण कुमार.

थाळी फेक : योगेश काथुनिया.

भालाफेक : देवेंद्र झाझेरिया.

कांस्य पदक विजेते खेळाडू

भालाफेक : सुंदर सिंग गुर्जर.

नेमबाजी : सिंहराज अधाना, अवनी लेखरा.

उंच उडी : शरद कुमार.

आर्चरी : हरविंदर सिंग.

बॅडमिंटन : मनोज सरकार.

हे भारतीय खेळाडू पदकांपासून वंचित राहिले. स्वरूप उन्हाळकर (शूटिंग, संदीप चौधरी, सोमण राणा, नवदीप (अॅथलेटिक्स) आणि तरुण ढिल्लन (बॅडमिंटन) हे त्यांच्या इव्हेंटमध्ये चौथ्या स्थानावर राहिले. सकीना खातून (पॉवरलिफ्टिंग), राम पाल, अमित सरोहा (अॅथलेटिक्स) आणि राहुल जाखड (शूटिंग) पाचव्या स्थानावर राहिले.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leftover Frying Oil : तळून उरलेल्या तेलाचा 'या' कामांसाठी होतो उपयोग

Today's Marathi News Live : मुंबईतील पश्चिम उपनगर परिसरातील महिला पत्रकाराला धमकी, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू

Kalyan Crime News : तब्बल 150 सीसीटीव्हीची तपासणी, 46 क्रमांक पाहताच पाेलिसांनी महागड्या बाईक चाेरणा-याला केलं जेरबंद

kitchen Hacks: गव्हाच्या पिठात किडे होतात ? हे भन्नाट उपाय करा, राहिल वर्षभर फ्रेश

Makhana Benefits : रोज मखाणा खा, अनेक आजार दूर पळवा!

SCROLL FOR NEXT