Tokyo Olympics : भारतीय महिला हॉकी संघाची सेमी फायनलमध्ये धडक...  Saam Tv
Sports

Tokyo Olympics : भारतीय महिला हॉकी संघाची सेमी फायनलमध्ये धडक...

ऑलिम्पिक मध्ये इतिहासात तब्बल ४९ वर्षांनी भारतीय पुरुषांच्या हॉकी टीमने सेमी फायनल मध्ये प्रवेश केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टोकयो : ऑलिम्पिक Olympics मध्ये इतिहासात तब्बल ४९ वर्षांनी भारतीय पुरुषांच्या हॉकी Hockey टीमने सेमी फायनल Final मध्ये प्रवेश केला आहे. पुरुषांच्या टीमपासून प्रेरणा घेत भारतीय Indian महिला Women टीमने देखील बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा Australia १- ० ने पराभव केले आहे. ऑलिम्पिक इतिहासामध्ये पहिल्यांदा भारतीय महिला हॉकी टीमने सेमी फायनलमध्ये प्रवेश केले आहे.

ऑलिम्पिकच्या स्पर्धेत ३ वेळा गोल्ड मेडल जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारताने इतिहास रचला आहे. भारतीय टीमला या मॅचच्या अगोदरच धक्का बसला होता. पहिल्या क्वार्टरमध्ये शर्मिला ही जखमी झाली होती. या दुखापतीनंतर भारताने झुंजारपणे झुंज खेळ केला आहे. ऑस्ट्रेलियन टीमच्या चांगल्या चाली आपल्या टीमने उधळून लावली आहे.

हे देखील पहा-

यामुळे पहिल्या क्वार्टर मध्ये दोन्ही टीमला एकही गोल करता आलेले नाही. दुसऱ्या क्वार्टर मध्ये भारतीय टीमने वर्चस्व गाजवले आहे. गुरुजीत कौरनं यांनी २२ मिनिटाला गोल करत भारतीय टीमला आघाडी मिळवून दिली आहे. विशेष म्हणजे गुरुजीतने टीमला दिलेल्या पहिल्याच पेनल्टी कॉर्नवर गोल केले होते. गुरुजीतचा हा ऑलिम्पिक मधील पहिलाच गोल आहे.

या गोलने भारताने पहिल्या हाफमध्ये १- ० नं आघाडी घेतली आहे. भारतीय टीमने तिसऱ्या क्वार्टरमध्ये भक्कम बचावावर भर दिला आहे. सविता पुनियाच्या दमदार कामगिरीने ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या क्वार्टर मध्ये देखील यश मिळाले नाही. वर्ल्ड रँकिंग मध्ये देखील ऑस्ट्रेलिया नंबर २ वर आहे. ऑस्ट्रेलिया टीममध्ये अनुभवी आणि तरुण खेळाडूंचे चांगले मिश्रण आहे.

त्यांनी गोल करण्याचे जोरदार प्रयत्न केले होते. पण ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या क्वार्टर मध्ये गोल करण्यात यश मिळालेले नाही. चौथ्या आणि शेवटच्या क्वार्टर मध्ये ऑस्ट्रेलियाचे २ पेनल्टी कॉर्नर भारतीय टीमने निष्फळ ठरवले आहेत. ऑस्ट्रेलियाने शेवटच्या मिनिटापर्यंत गोल करण्याचे जोरदार प्रयत्न करत होते. ऑस्ट्रेलियाला मॅच संपण्यास ३ मिनिटे कमी असतानाच, आणखी पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. भारतीय बचाव फळीने ते गोल देखील अडवले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

Trump Putin Summit : भारतावरचा टॅरिफ रद्द होणार? ट्रम्प-पुतीन भेटीत काय घडलं?

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवात ७५ गोविंदा जखमी, काहींची प्रकृती गंभीर, एकाचा मृत्यू

Dog Bite: दिसेल त्याचे तोडले लचके;इंदापुरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ,सीसीटीव्हीत घटना कैद

SCROLL FOR NEXT