INDvsENG: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाचा दारुण पराभव

क्रॉसच्या भेदक गोलंदाजी समोर भारतीय संघ टिकाव धरु शकला नाही.
Team India
Team IndiaTwitter/ @ICC

इंग्लंडची महिला गोलंदाज कॅट क्रॉसने (Kate Cross) बुधवारी दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात आपल्या गोलंदाजीमुळे भारतीय महिला (Women's Team India) संघाच्या फलंदाजांना चारी मुंड्या चित केले. क्रॉसच्या भेदक गोलंदाजी समोर भारतीय संघ टिकाव धरु शकला नाही. तिने पाच बळी घेऊन भारतीय संघाला स्वस्त धावसंख्येमध्ये रोखले. भारतीय महिला संघाने 50 षटकांत 221 धावा केल्या. 10 षटकांमध्ये क्रॉसने 34 धावा देऊन पाच बळी घेतले.

दुसरीकडे, 222 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या महिला संघाला चांगली सुरुवात मिळाली नाही, परंतु संघाने हे लक्ष्य 47. 3 षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात गाठले आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकली. यजमानांनी जिंकलेल्या तीन एकदिवसीय वनडे सामन्यांच्या मालिकेतील हा दुसरा सामना होता. पहिला सामनाही यजमान इंग्लंडने जिंकला. इंग्लंडच्या संघाने पहिला सामना 8 गडी राखून जिंकला होता.

Team India
IPL 2022 मध्ये दोन नवीन संघ घेण्यासाठी BCCI चं ठरलं? जाणून घ्या संघ

सोफिया डन्कलेने 81 चेंडूत 73 धावांची नाबाद खेळी केली, तर कॅथरीन ब्रंटने 46 चेंडूत नाबाद 33 धावा केल्या आणि संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. इंग्लंडकडून लॉरेन विनफिल्ड हिलने 42 धावांची खेळी केली. मात्र, भारताची कर्णधार मिताली राज मानेच्या दुखण्यामुळे मैदानात उतरली नाही आणि तिची जागा हरमनप्रीत कौरने घेतली.

यापूर्वी भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. मिताली राज आणि हरमनप्रीत कौर यांनी संघासाठी चौथ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली. मितालीने तिच्या कारकिर्दीतील 57 वे एकदिवसीय अर्धशतक झळकावले. तिने ५९ धावांच्या खेळीत ९२ चेंडूंचा सामना केला. ज्यामध्ये तिने ७ चौकार ठोकले. ती धावचीत झाली. मितालीशिवाय सलामीवीर शेफाली वर्माने 55 चेंडूत 44 धावा केल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com