Suryakumar Yadav saam tv
Sports

Suryakumar Yadav: काही ठिकाणी सुधारणा करणं...; विजयानंतर काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

Suryakumar Yadav: रविवारी ग्वाल्हेरच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात टीम इंडियाचे गोलंदाज आणि फलंदाजांची कामगिरी वाखाणण्याजोगी होती. दरम्यान टीमच्या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमारने खेळाडूंचं कौतुक केलं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन्सीमध्ये टीम इंडियाने बांगलादेशाच्या विरूद्धच्या टी-२० सिरीजच्या पहिल्याच सामन्यात विजय मिळवला आहे. यामुळे ३ सामन्यांच्या या सिरीजमध्ये टीम इंडियाने १-० अशी आघाडी घेतली आहे. रविवारी ग्वाल्हेरच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात टीम इंडियाचे गोलंदाज आणि फलंदाजांची कामगिरी वाखाणण्याजोगी होती.

या सामन्यात हार्दिक पांड्याने आपल्या शानदार फलंदाजीने भारतासाठी सामना भारताच्या पारड्यात टाकला. दरम्यान सिरीजमधील पहिल्याच सामन्यातील विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव खूश दिसून आला. सामन्यानंतर त्याने टीमच्या खेळाडूंचं कौतुक केलं आहे.

टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितलं की, आम्ही फक्त आमच्या टॅलेंटनुसार खेळण्याचा प्रयत्न केला. सामन्यापू्र्वी टीम मिटिंगमध्ये जो काही निर्णय झाला त्याची अंमलबजावणी केली. दरम्यान सामन्यात देखील खेळाडूंनी चांगला उत्साह दाखवला.

सूर्यकुमारने या सामन्यात डेब्यू करणारे मयंक यादव आणि अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी यांचं कौतुक केलं. सूर्या म्हणाला, 'मी पुढच्या सामन्यांमध्ये या दोघांना पाहण्यासाठी उत्सुक आहे. जेव्हा तुम्ही मैदानावर असता आणि तुमच्याकडे अतिरिक्त गोलंदाजीचे पर्याय असतात तेव्हा डोकेदुखी होऊ लागते, मात्र अशा प्रकारची डोकेदुखी चांगली असते. प्रत्येक सामन्यात तुम्ही काहीतरी नवीन शिकता. काही ठिकाणी आम्हाला सुधारणा आवश्यक आहे, आम्ही पुढील सामन्यापूर्वी यावर नक्कीच चर्चा करू.

टीम इंडियाचा बांगलादेशावर विजय

पहिल्या टी-२० सामन्यात टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेशची टीम १२७ रन्सवर ऑलआऊट झाली. यावेळी टीम इंडियाला १२८ रन्सचं जिंकण्यासाठी आव्हान देण्यात आलं. भारताने अवघ्या 11.5 ओव्हर्समध्ये 3 विकेट्स गमावून 132 रन्स केले आणि सामना 7 विकेट्सने जिंकला.

टीम इंडियाच्या विजयात अनेक खेळाडूंनी मोलाचा वाटा उचलला . दरम्यान हार्दिक पंड्याच्या ताबडतोड खेळीने सर्वांची मनं जिंकली. हार्दिकने या सामन्यामध्ये 243.75 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. हार्दिकने 16 चेंडूत 39 रन्स केले आणि टीमला विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या बसची चावी घेऊन ठोकली धूम; जंतर-मंतरवर महिलेचं कृत्य पाहून पोलीस चक्रावले, VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी पप्या शिंदेच्या पोलीस कोठडीत वाढ; 9 ऑक्टोबरपर्यंत कोठडी

Migraine Home Remedies: डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होताच करा 'हे' ७ घरगुती उपाय; मिळू शकतो झटपट आराम

महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 2 अधिकाऱ्यांची मंत्रालयातच नियुक्ती, कोणाला कुठे जबाबदारी?

Home Remedies : व्हाईट सॉक्स दिसतील एकदम नवीन! घाणेरडे मोजे स्वच्छ करण्याच्या सोप्या घरगुती टिप्स

SCROLL FOR NEXT