Sports

LSG VS MI: मोक्याच्या क्षणी तिलकला माघारी बोलावलं, डगआऊटमध्ये बसलेला सूर्या हैराण; हार्दिक की कोच कोणाच्या निर्णयाने टीमचं झालं वाटोळं

Tilak Varma Surya dugout confusion: मुंबई इंडियन्सला यंदाच्या हंगामात तिसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. आतापर्यंत त्यांनी केवळ एकदाच विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे या सामन्यात एक अशी घटना घडली, जी फारशी सामन्यांमध्ये पाहायला मिळत नाही.

Surabhi Jayashree Jagdish

शुक्रवारी एकाना स्टेडियममध्ये लखनऊ सुपर जाएंट्स विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगला होता. हा सामना गाजला तो केवळ एका गोष्टीने. या सामन्यात १९ वी ओव्हर संपण्यासाठी एक बॉल बाकी असताना मुंबईच्या टीमने असा काही निर्णय घेतला ज्यामुळे मुंबईच्या डगआऊटमध्ये बसलेले खेळाडू आणि फॅन्स देखील हैराण झाले. या सामन्यात सेट झालेला फलंदाज तिलक वर्माला अचानक रिटायर्ड आऊट करण्यात आलं. या निर्णयानंतर हार्दिकला सामना जिंकवून देता आला नाही आणि लखनऊच्या टीमचा १२ रन्सने विजय झाला.

मुंबई इंडियन्सचा हा तिसरा पराभव होता. एमआयने या सिझनमध्ये आतापर्यंत केवळ एक सामना जिंकला आहे. दरम्यान या सामन्यात असं काही घडले जे सहसा सामन्यांमध्ये दिसत नाही. तिलक वर्माला रिटायर्ड आऊट केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

तिलक वर्मा रिटायर्ड आऊट झाल्याने सूर्याही हैराण

मुंबई इंडियन्सला जिंकण्यासाठी ७ चेंडूत २४ रन्सची गरज असताना तिलक वर्मा रिटायर्ड आऊट झाला. यावेळी त्याच्या जागी मिचेल सँटनरला संधी देण्यात आली. मैदानाबाहेर जाताना तिलकने २३ चेंडूत २५ रन्स केले होते. तिलकला हार्दिकने रिटायर्ड आऊट व्हायला सांगताच डगआऊटमध्ये बसलेला सूर्यकुमार यादव आश्चर्यचकित झाल्याचं दिसून आलं.

यावेळी मुंबईच्या डगआऊटमध्ये बसलेले अनेक खेळाडू हैराण झाले होते. मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धने सूर्यकुमार यादवकडे आले आणि त्याला परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेवरील कॉमेंट्रीमध्ये हा प्रशिक्षकांचा निर्णय असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण मैदानातील सर्व निर्णय कर्णधार टीमसाठी घेऊ शकतो. त्यामुळे हार्दिकच्या सांगण्यावरून मिचेल सँटनरला फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं असतं.

तिलक वर्मा का झाला Retired out?

लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध रन्सचा पाठलाग करताना तिळक वर्मा टीमला आवश्यक असलेल्या इंटेटने फलंदाजी करताना दिसला नाही. त्याने 23 चेंडूत केवळ 25 रन्स केले होते. तो लखनऊच्या गोलंदाजांविरुद्ध संघर्ष करताना दिसला. त्यामुळे मॅनेजमेंटने त्याला पव्हेलियनमध्ये बोलावण्याचा निर्णय घेतला आणि मिचेल सँटनरला मैदानात पाठवलं.

मुंबईचा हा निर्णय योग्य होता का?

तिळक वर्माच्या जागी आलेल्या मिचेल सँटनरने केवळ दोन बॉल खेळून दोन रन्स केले. याशिवाय हार्दिक पांड्याने शेवटचे पाच चेंडू खेळले ज्यात तो केवळ 8 रन्स करू शकला. ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर हार्दिकने एकही रन घेण्यासही नकार दिला होता. त्यानंतर कमेंटेटर्सने प्रतिक्रिया दिली की, जर त्याला असंच करायचं होतं तर तिळकांना रिटायर्ड आऊट करण्याची गरज नव्हती.

आवेश खानने शेवटच्या ओव्हरमध्ये केवळ 9 रन्स दिले. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 12 रन्सने दारूण पराभव झाला. त्यामुळे मुंबईचा हा निर्णय त्यांच्यासाठी भारी पडल्याचंच दिसून आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

SCROLL FOR NEXT