IPL2025 Ticket News saam tv
Sports

IPL 2025: आयपीएलच्या तिकीटांची विक्री सुरु, काय आहे किंमत? कुठून विकत घेऊ शकता जाणून घ्या प्रोसेस

IPL2025 Ticket News: यंदाच्या आयपीएल हंगामात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात पहिला सामना होणार आहे. हा रोमांचक सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आजपासून आयपीएलचा थरार सुरु होणार आहे. देशात क्रिकेट प्रेमी जास्त असून प्रत्येकाला सामन्याचं तिकीट मिळवायचं आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी होणार आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर हा सामना रंगणार आहे. तर आता आयपीएल सामन्याच्या तिकिटांची विक्री सुरू झाली आहे. पहिल्या सामन्याचे तिकीट ४०० ते ५० हजार रुपयांदरम्यान आहे.

आयपीएलची टीम आणि स्टेडियमनुसार सामन्यांच्या तिकिटांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. बुकमाय शो आणि पेटीएम इनसाइडर तसेच बॉक्स ऑफिसवरूनही तुम्ही तिकिटं खरेदी करू शकता. त्याचबरोबर आयपीएलच्या काही टीम्स आपल्या अधिकृत वेबसाईटवर सामन्यांची तिकिटंही विकत घेऊ शकतात.

ऑनलाईन-ऑफलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध

जर तुम्हाला आयपीएल सामन्यांची तिकिटं विकत घ्यायची असतील तर तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पैकी एक निवडू शकता. ऑनलाइन पर्यायांमध्ये बुक माय शो, पेटीएम, IPLT20.com त्याचप्रमाणे फ्रँचायझी टीमच्या वेबसाइट्सचा समावेश आहे. ऑफलाइन तिकीट खरेदी करायचे असेल तर स्टेडियममध्ये बांधलेल्या बॉक्स ऑफिसवरून विकत घेऊ शकता.

काय आहे तिकीटांची किंमत?

आयपीएल च्या तिकिटांची किंमत अनेक गोष्टींवर अवलंबून असते. स्टेडियम, टीम आणि तुमचं सीटची श्रेणीनुसार यानुसार त्यांची किंमत ठरवण्यात येते.

तिकीट बुक करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल?

आयपीएलची तिकिटे खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवा की मोठ्या टीम्सच्या सामन्यांची तिकिटं लवकर विकली जातात. त्यामुळे तुम्हाला जर तिकीट विकत घ्यायची असतील तर पटकन खरेदी करा. तिकिटं विकत घेताना ती अधिकृत वेबसाइटवरून बुक करा. नोटिफिकेशनवर लक्ष ठेवा. आयपीएल किंवा बीसीसीआयच्या तिकिटांबाबतच्या अधिकृत घोषणेवर लक्ष ठेवा.

मुंबईमध्ये देखील सुरु आहे तिकीट विक्री

मुंबई इंडियन्स टीमनेही त्यांच्या सामन्यांची तिकीटं विकण्यास सुरुवात केली आहे. मुंबई इंडियन्स फॅमिली मेंबरशिपचे गोल्ड, सिल्व्हर आणि ज्युनियर सदस्य पहिल्या टप्प्यात आपल्या टीमचे होम मॅच राखीव ठेवली आहेत. मुंबईने तिकीट विक्रीची पहिली फेरी ३ मार्चपासून सुरू केली, जी ४ मार्चपर्यंत सुरु होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

SCROLL FOR NEXT