Travis Head and Maxwells saam tv
Sports

SRH vs PBKS: 3 कांगारू खेळाडू मैदानावर भिडले! Live सामन्यात ट्रेविस हेड आणि मॅक्सवेलमध्ये जोरदार राडा; स्टॉयनिसचीही वाद उडी, पाहा Video

SRH vs PBKS 2025: शनिवारी पंजाब किंग्ज विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात एक मोठा वाद झाला. या सामन्यात हेड आणि मॅक्सवेल यांच्यात भांडण झालं होतं.

Surabhi Jayashree Jagdish

शनिवारी पंजाब किंग्ज विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने उत्तम खेळ करत सामना जिंकला. सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जने दिलेलं २४६ रन्सचं लक्ष्य ९ बॉल शिल्लक असताना पूर्ण केलं आणि ८ विकेट्सने ऐतिहासिक विजय मिळवला. अभिषेक शर्माचे १४१ आणि ट्रॅव्हिस हेडच्या ६६ रॅन्सच्या जीवावर हैदराबादने सामना जिंकला. मात्र या सामन्यात दोन कांगारू खेळाडू भर मैदानात एकमेकांशी भिडले होते.

ट्रेविस हेड फलंदाजी करत असताना पंजाब किंग्जचा खेळाडू आणि त्याचाच आस्ट्रेलियन टीममेट ग्लेन मॅक्सवेलशी जोरदार वाद झाला. इतकंच नाही तर यामध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू मार्कस स्टोइनिसनेही या लढतीत उडी घेतली.

काय घडलं नेमकं प्रकरण?

सनरायझर्स हैदराबादच्या डावाच्या ९व्या ओव्हरमध्ये ट्रेव्हिस हेड आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यात जोरदार वाद झाला. या ओव्हरचा शेवटचा डॉट बॉल होता. हा बॉल खेळल्यानंतर हेडने रागात मॅक्सवेलला काहीतरी बोलायला सुरुवात केली. यावेळी हेडला इतका राग का आला हे मॅक्सवेलला समजलं नाही. यावेळी मॅक्सवेलही काहीसा चिडला.

दोघांचा वाद पाहता अंपायरने परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु हेड सतत काहीतरी बोलत राहिला. यानंतर पंजाब किंग्जचा भाग असलेला मार्कस स्टोइनिस आला आणि थेट हेडशी काहीतरी बोलू लागला. स्टोइनिस थोडा हसला आणि मग दोघे आपल्या जागेवर गेले. पण हा वाद या डॉट बॉलमुळे नव्हता, तर तो आधीच सुरू झाला होता.

का झाला या दोघांमध्ये वाद?

या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर दोन्ही ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये वाद सुरू झाला. याआधी हेडने मॅक्सवेलच्या सलग दोन चेंडूंवर सिक्स लगावले होते. हेडने पाचवा बॉल डिफेन्ड केला. ज्यावेळी बॉल मॅक्सवेलकडे गेला आणि त्याने तो पुन्हा कीपरकडे फेकला. हेडला वाटलं की, बॉल त्याच्या जवळून गेला आहे आणि तो रागाने मॅक्सवेलला काहीतरी म्हणाला.

ट्रॅव्हिस हेडने ३७ चेंडूत ६६ धावांची शानदार खेळी केली, या खेळीत त्याने ३ सिक्स आणि ९ फोर मारले. हेडने अभिषेक शर्मासोबत पहिल्या विकेटसाठी १७१ रन्सची पार्टनरशिप केली. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने ८ विकेट्सने विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

SCROLL FOR NEXT