Shardul Thakur: गोलंदाजीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या कमेंटेटर्सवर भडकला शार्दूल; म्हणाला, स्टुडियोमध्ये बसून काहीही...!

Shardul thakur gets angry : काही कमेंटेटर्सने लखनऊ सुपर जाएंट्सच्या गोलंदाजांवर प्रश्न उपस्थित केलं होतं. दरम्यान यावर आता शार्दूलने समालोचकांना झापलं आहे.
Shardul Thakurs
Shardul Thakursaam tv
Published On

आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिलेला शार्दूल ठाकूर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी शार्दूलने कंमेटेटर्सना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. आयपीएल २०२५ च्या सिझनपूर्वी लखनऊ सुपर जायंट्सच्या गोलंदाजीवर अनेक दिग्गज खेळाडूंनी आणि सामन्यात कमेंट्री करणाऱ्या कमेंट्रीटर्सने टीका केली होती. या सिझनपूर्वी मोहसीन खान लखनऊ टीमबाहेर गेला आणि त्याजागी शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली.

शार्दूलची टीममध्ये एन्ट्री होताच त्याने त्याच्या गोलंदाजीची जादू दाखवली. सध्या लखनऊ सुपर जाएंट्सचा खेळ देखील चांगला सुरु आहे. अशातच आता शार्दुलने कंमेट्रीटर्सना चांगलच सुनावलं आहे.

Shardul Thakurs
SRH vs PBKS IPL 2025: हैदराबादमध्ये अभिषेक शर्माचं वादळ; शतकाच्या तडाख्यात पंजाबच्या धावांचा डोंगर ढासळला

गुजरातसमोर लखनऊच्या गोलंदाजांनी पहिल्या १० ओव्हर्समध्ये १०३ रन्स दिल्या. त्यानंतर लखनऊच्या गोलंदाजांनी कमबॅक करत आणि गुजरातला १८० रन्सवर रोखलं आणि पुढील १० ओव्हर्समध्ये फक्त ७७ रन्स दिले.

काय म्हणाला शार्दूल ठाकूर?

शार्दूल म्हणाला की, बऱ्याचदा कमेंट्रीटर्स गोलंदाजांबाबत खूप कठोर होतात. मात्र हे समजून घ्यावं लागेल की, क्रिकेट आता २०० किंवा त्याहून अधिकच्या रन्सकडे वळलंय. टीका नेहमीच टीकाकारांकडून होत असते. स्टुडिओमध्ये बसून गोलंदाजीविरुद्ध बोलत राहणं हे खूप सोपं काम आहे. पण मैदानात जे घडतंय त्याची त्यांना कल्पनाच नाही. स्वतःला मैदानात काय चाललंय ते माहित नाही.

Shardul Thakurs
Mohammed Shami : आंतरराष्ट्रीय स्टार शमीचा लाजिरवाणा विक्रम; थेट दुसऱ्या स्थानी मारली उडी, पंजाबविरुद्धच्या सामन्यात काय घडलं?

दुपारच्या सामन्यात सुरुवातीला खेळपट्टी बरीच ड्राय होती. त्यामुळे बॉल जसजसा जुना होत गेला तसतसा आम्ही आमचा खेळ बदलत गेलो. यावेळी आम्ही आमच्या योजना चांगल्या प्रकारे राबवू शकलो, असंही शार्दूल म्हणाला.

Shardul Thakurs
Ishan Kishan : इथं दिसना तिथं दिसना... फिल्डिंग करताना इशान किशनची उडाली तारांबळ, बॉल शोधताना झाला गोंधळ

शार्दूलची यंदाच्या आयपीएलमधील कामगिरी

शार्दुल ठाकूरबद्दल बोलायचं झालं तर त्याने गुजरातविरुद्धच्या चार ओव्हर्सच्या स्पेलमध्ये ३४ रन्स देत दोन विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल २०२५ च्या सिझनमध्ये शार्दुलने आतापर्यंत सहा सामन्यांमध्ये ११ विकेट्स घेतल्यात. तर ३४ रन्समध्ये चार विकेट्स घेणं हा त्याचा आतापर्यंतचा सर्वोत्तम स्पेल होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com