IPL 2025 Mega Auction saam tv
क्रीडा

IPL 2025 Mega Auction: आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये मालामाल होणार हे गोलंदाज; दुलिप ट्रॉफीमध्ये केली चमकदार कामगिरी

IPL 2025 Mega Auction Anshul Kamboj Aaqib Khan: यंदाच्या आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये काही खेळाडूंवर मोठ्या रकमेची बोली लागण्याची शक्यता आहे. काही तरूण खेळाडूंनी दुलीप ट्रॉफी 2024 मध्ये चमकदार कामगिरी केलीये.

Surabhi Jagdish

नुकतंच देशांतर्गत दुलिप ट्रॉफी २०२४ खेळवण्यात आली. या स्पर्धेमध्ये इंडिया A च्या टीमने बाजी मारली. दरम्यान यंदाच्या या स्पर्धेमध्ये असे अनेक नवखे खेळाडू आहे, ज्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये काही खेळाडूंवर मोठ्या रकमेची बोली लागण्याची शक्यता आहे.

अंशुल कंबोज आणि आकिब खान यंदाची दुलीप ट्रॉफी 2024 मध्ये चमकदार कामगिरी केली. आकिब हा भारत अ टीमचा भाग होता. तर अंशुल भारत क टीमकडून खेळला. यंदाच्या स्पर्धेमध्ये तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला असून या दोन्ही गोलंदाजांना आयपीएल 2025 मेगा ऑक्शनमध्ये मोठी रक्कम मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

इंडिया ए ने जिंकला दुलिप ट्रॉफीचा खिताब

यंदाच्या दुलिप ट्रॉफीमध्ये इंडियाने ए टीमने दुलीप ट्रॉफी 2024 चं विजेतेपद पटकावलंय. यावेळी त्यांनी भारत सी टीमचा 132 रन्सने पराभव केला. अंशुल भारत सी टीमचा भाग आहे. यावेळी तो या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरलाय. अंशुलने 3 सामन्यात 16 विकेट घेतल्या. गेल्या ऑक्शनमध्ये त्याला मुंबई इंडियन्सने 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर खरेदी केलं होतं. मात्र यावेळी त्यांना मोठी रक्कम मिळू शकते. यावेळी त्याच्यावर कोणत्या टीमकडून बोली लागणार हे पाहावं लागणार आहे.

आकिब खान भारत ए टीमकडून खेळत होता. त्याने दुलीप ट्रॉफी 2024 च्या 2 सामन्यात 8 विकेट्स घेतल्या होत्या. अजून आकिबने आयपीएलच्या स्पर्धेत डेब्यू केला नाहीये. मात्र त्याचा यंदाच्या स्पर्धेतील खेळ पाहता, त्याला टीम इंडियामध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. आकिबने प्रथम श्रेणीत 37 विकेट्स घेतल्या आहेत. तर लिस्ट ए मध्ये 14 विकेट्स घेतल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: मोर्शीमध्ये भाजपचे उमेश यावलकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Bhandara News : धरणाच्या प्रवाहात मासेमारी करताना बुडून मृत्यू; मृतदेह वीज निर्मिती कार्यालयात नेट नातेवाईकांचा गोंधळ

Chanakya Niti: आजपासून स्वत:ला लावा या सवयी, पैशाची चणचण कायमची सुटेल

Maharashtra Exit Poll : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Kalwan Exit Poll: कळवण मतदारसंघातून जे. पी. गावित होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

SCROLL FOR NEXT