ms dhoni with hardik pandya google
Sports

IPL 2024: आयपीएल २०२४ स्पर्धेतून ५ खेळाडू होऊ शकतात बाहेर! यादीत दिग्गज खेळाडूंचा समावेश

IPL 2024 News: आयपीएल २०२४ स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेसाठी सर्व खेळाडू कसून मेहनत घेताना दिसून येत आहेत.

Ankush Dhavre

Players Who Likely To Miss IPL 2024:

आयपीएल २०२४ स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेसाठी सर्व खेळाडू कसून मेहनत घेताना दिसून येत आहेत. १९ डिसेंबर रोजी या स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव झाला, या लिलावात खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागली. दरम्यान ५ असे खेळाडू आहेत, जे या स्पर्धेतून बाहेर होऊ शकतात.

हार्दिक पंड्या

मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला १५ कोटी मोजत आपल्या संघात स्थान दिलं आहे. इतकच नाही तर रोहितला कर्णधारपदावरून काढून ही जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवली आहे. दरम्यान हार्दिक पंड्या आयपीएल २०२४ स्पर्धा खेळणार का? हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. वर्ल्डकप २०२३ स्पर्धेदरम्यान तो गोलंदाजी करत असताना दुखापतग्रस्त झाला होता. अशी चर्चा सुरू आहे की, अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या टी -२० मालिकेत हार्दिक पंड्या खेळताना दिसून येणार नाही.

मोहम्मद शमी

वर्ल्डकप गाजवणाऱ्या मोहम्मद शमीच्या आयपीएल २०२४ स्पर्धेत खेळण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शमी पूर्णपणे फिट नसून, त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे आणि कसोटी मालिकेतून बाहेर राहावं लागलं आहे. तो अफगाणिस्तानविरुद्धच्या टी -२० मालिकेत खेळताना दिसून येण्याची शक्यता कमी आहे. (Latest sports updates)

सूर्यकुमार यादव

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील टी -२० मालिकेत सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता. या मालिकेतील तिसऱ्या टी -२० सामन्यादरम्यान तो दुखापतग्रस्त झाला होता. नुकताच सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात तो वॉकर आणि क्रचेसच्या साहाय्याने चालताना दिसून येत आहे. तो अफगाणिस्तानविरुद्धच्या टी -२० मालिकेला मुकण्याची शक्यता कमी आहे. तसेच तो आयपील स्पर्धेतूनही बाहेर होऊ शकतो.

एमएस धोनी

चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार एमएस धोनी आयपीएल २०२३ स्पर्धेदरम्यान गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त असल्याचे दिसून आले होते. ४२ वर्षीय धोनी जेव्हा आपल्या गावी गेला होता, त्यावेळी पायऱ्या उतरताना त्याला त्रास होत असल्याचं दिसून आलं होतं. आगामी हंगामासाठी त्याला चेन्नई सुपर किंग्जने रिटेन केले आहे.

नवीन उल हक

लखनऊ सुपरजायंट्स संघाचं प्रतिनिधित्व करत असलेला नवीन उल हक देखील आयपीएल २०२४ स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो. कारण अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डने त्याला NOC देण्यास नकार दिला आहे. नवीनने अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाला आपलं नाव सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये घेऊ नका असं म्हटलं होतं. त्याने लीग क्रिकेट स्पर्धा खेळण्याला प्राधान्य दिलं. त्यामुळे अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये घेतलंच नाही. याशिवाय NOC देण्यासही नकार दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

हिंगोलीत अनंत चतुर्दशीचा जल्लोष; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो महिला भाविकांची उपस्थिती|VIDEO

SCROLL FOR NEXT