ind vs pak saam tv
Sports

Champions Trophy 2025: लिहून घ्या, हेच ४ संघ सेमीफायनलमध्ये जाणार; दिग्गज खेळाडूंची मोठी भविष्यवाणी

Champions Trophy 2025 Semi Final Teams Prediction: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत कोणते ४ संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार? याबाबत दिग्गज खेळाडूंनी भविष्यवाणी केली आहे.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा थरार पाकिस्तानात रंगणार आहे. जगभरातील ८ बलाढ्य संघ जेतेपदाची ट्ऱॉफी उंचावण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. २०१७ मध्ये शेवटची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पार पडली होती. या स्पर्धेतील फायनलमध्ये पाकिस्तानने भारतीय संघाला पराभूत करत जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. आता ८ वर्षांनंतर पाकिस्तानात या स्पर्धेचे आयोजन केले गेले आहे.

या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. सर्व ७ संघ आपले सामने पाकिस्तानात खेळणार आहेत. मात्र बीसीसीआयने भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला होता. त्यामुळे या स्पर्धेचे आयोजन हायब्रिड मॉडेलमध्ये करण्यात आले आहे. भारतीय संघाचे सामने दुबईत खेळवले जाणार आहेत. दरम्यान या स्पर्धेत कोणते ४ संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार, याबाबत दिग्गज खेळाडूंनी भविष्यवाणी केली आहे.

कोणते ४संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार?

स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट एक्स्पर्ट पॅनेलने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत कोणते ४ संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करु शकतात, याबाबत भविष्यवाणी केली आहे. इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसनच्या मते, भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करु शकतो. तर भारताचा माजी फलंदाज मुरली विजयच्या मते, भारत, पाकिस्तान,ऑस्ट्रेलियाचा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करु शकतो.

समालोचक आणि माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राच्या मते, भारत, न्यूझीलंड,दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानचा संघ सेमी फायनलमध्ये प्रवेश करु शकतो. तर संजय बांगर यांच्यात मते, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचा संघ सेमी फायनलमध्ये प्रवेश करू शकतो. दीप दास गुप्ता यांच्या मते, भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा संघ सेमी फायनलमध्ये प्रवेश करू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT