Suryakumar Yadav saam tv
Sports

Suryakumar Yadav: सूर्या भाऊनं जिंकली मनं! पाकिस्तानविरोधातील विजय भारतीय सैन्याला समर्पित, नेमकं काय म्हणाला कर्णधार?

Team India Victory For Victims Of Pahalgam Terror Attack: क्रिकेटच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे केवळ एक खेळ नसतो. तर तो दोन्ही देशांच्या चाहत्यांसाठी एक महासंग्राम असतो. जेव्हा भारतीय संघ पाकिस्तानला हरवतो, तेव्हा तो विजय खूप खास असतो.

Surabhi Jayashree Jagdish

  • भारताने पाकिस्तानवर ७ विकेट्स राखून विजय मिळवला.

  • सूर्यकुमार यादवने पहलगाम पीडितांना विजय अर्पण केला.

  • हा विजय भारतीय सैन्याला समर्पित करण्यात आला.

आशिया कप २०२५ मधील लीग सामन्यात भारताने पाकिस्तानवर ७ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. या शानदार विजयानंतर भारतीय टीमचा कर्णधार सूर्यकुमार यादवने एक महत्त्वपूर्ण आणि भारतीय चाहत्यांच्या मनाला भिडणारं विधान केलं आहे. सूर्यानं हा विजय पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना अर्पण केला असून त्याचबरोबर भारतीय सैन्याला देखील हा विजय समर्पित केल्याचं म्हटलंय.

पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयानंतर त्याने स्पष्ट केलं की, हा विजय आपल्या देशाच्या शौर्य आणि पराक्रमाचं प्रतीक आहे.

सूर्यकुमार यादवने दिलं पाकिस्तानला प्रत्युत्तर

आशिया कप २०२५ स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीत (यूएई) खेळवली जातेय. पाकिस्तानविरुद्धच्या या विजयाला सूर्यकुमार यादवने पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना अर्पण करून पाकिस्तानला थेट संदेश दिला.

सामन्याच्या सुरुवातीला टॉसदरम्यानही सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगाशी हस्तांदोलन केलं नाही. एवढंच नव्हे तर सामना संपल्यानंतरही भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंकडे दुर्लक्ष केलं आणि कोणाशीही हात न मिळवता थेट ड्रेसिंग रूममध्ये परतले.

विजय भारतीय सैन्याला समर्पित – सूर्यकुमार यादव

सामन्यानंतर बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला, "आम्ही पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसोबत खंबीरपणे उभे आहोत. हा विजय आम्ही भारतीय सैन्याला अर्पण करतो. त्यांनी दाखवलेल्या साहसामुळे आम्हाला प्रेरणा मिळते. आम्ही सदैव त्यांना मैदानातून अभिमानाची संधी देऊ. जेव्हा जेव्हा संधी मिळेल, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू."

भारताचा पाकिस्तानवर ७ गडी राखून दणदणीत विजय

पाकिस्तानच्या टीम भारतीय गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. प्रथम गोलंदाजी आणि त्यानंतर फलंदाजीत भारतीय टीमने आपल्या अप्रतिम खेळाची झलक दाखवून पाकिस्तानचा धुव्वा उडवला. पाकिस्तानकडून मिळालेल्या १२८ रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग भारताने केवळ १५.५ ओव्हर्समध्ये ३ गडी गमावून १३१ रन्स करत सहज गाठला आणि ७ गडी राखून विजय मिळवला.

अभिषेक शर्माची आक्रमक सुरुवात

भारतीय डावाची सुरुवात अभिषेक शर्माने आक्रमक पद्धतीने केली. पाकिस्तानचा मुख्य गोलंदाज शाहीन आफ्रिदी याच्या पहिल्याच दोन बॉलवर एक चौकार आणि एक षटकार ठोकून त्याने आपली धडाकेबाज खेळी दाखवून दिली. शर्माने फक्त १३ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर ३१ रन्स केले. तर शुबमन गिल ७ चेंडूत १० रन्स करून बाद झाला.

तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादवची भागीदारी

तिसऱ्या विकेटसाठी तिलक वर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्यात ५६ रन्सची महत्त्वाची भागीदारी झाली. तिलक वर्माने ३१ चेंडूत ३१ रन्स केले. त्यानंतर सूर्यकुमार यादवने जबाबदारीची खेळी करत टीमला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं. सूर्यकुमार यादव अखेरपर्यंत नाबाद राहिला. त्याने ३७ चेंडूत १ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ४७ रन्स केले. विजयाचा षटकार लगावत त्याने सामना संपवला.

आशिया कप २०२५ मध्ये भारताचा पाकिस्तानवर किती गडी राखून विजय झाला?

भारताने ७ विकेट्स राखून विजय मिळवला.

सूर्यकुमार यादवने विजय कोणाला अर्पण केला?

पहलगाम हल्ल्यातील पीडितांना आणि भारतीय सैन्याला अर्पण केला.

भारताने पाकिस्तानचे १२८ रन्सचे लक्ष्य किती ओव्हर्समध्ये गाठले?

१५.५ ओव्हर्समध्ये ३ बाद गमावून लक्ष्य गाठले.

अभिषेक शर्माने किती चेंडूत ३१ रन्स केले?

अभिषेक शर्माने फक्त १३ चेंडूत ३१ रन्स केले.

सूर्यकुमार यादवने किती धावा करून सामना संपवला?

सूर्यकुमार यादवने ४७ धावा करून विजयी षटकार लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मीरा भाईंदरसह वसई-विरार शहरात पावसाची रिपरिप

Nikhil Bane : फायनली ती माझ्या आयुष्यात आली; हास्यजत्रा फेम अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

Majalgaon Rain : माजलगावमध्ये ढगफुटी; गंगामसला येथील मोरेश्वर मंदिर पाण्याखाली, गावांमध्ये पाण्याचा वेढा

Kalyan Crime : हॉस्पिटलच्या नावाखाली डॉक्टर दाम्पत्याला लुबाडले, लाखो रुपये उकळले, कल्याणमधील धक्कादायक प्रकार

Bigg Bossनं घरातील 2 सदस्यांना सुनावली कठोर शिक्षा, संपूर्ण सीझनसाठी केले नॉमिनेट

SCROLL FOR NEXT