ind vs pak  yandex
Sports

IND vs PAK: पाकिस्तान क्रिकेट बोर्ड होणार बर्बाद! IND vs PAK सामना झाला नाही तर इतक्या कोटींचं होणार नुकसान

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा नेहमीच क्रिकेट जगतातील सर्वात मोठं आकर्षण ठरतंय. मात्र जर हा सामना झाला नाही तर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) ला प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावं लागणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

येत्या ७ फेब्रुवारीपासून टी-२० वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. दरम्यान वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे सर्वांना होणाऱ्या संभाव्य नुकसानाची माहिती देणारा एक मोठा रिपोर्ट समोर आलाय.

आयसीसी स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंदाजे सामना अंदाजे २५० दशलक्ष डॉलर्स कमाई करतो. येत्या टी-२० वर्ल्डकपमधून हा महत्त्वाचा सामना वगळल्यास मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंधांमुळे दोन्ही देशांमध्ये केवळ मल्टी-नेशन स्पर्धा खेळवल्या जातात. हा सामना रंगण्यापूर्वी चाहत्यांमध्ये मोठा उत्सा असतो. त्यामुळे आयसीसी देखील प्रत्येक स्पर्धेमध्ये या दोन्ही टीम्सना एकाच गटात ठेवते. या सामन्यांमधून ब्रॉडकास्टर्सनाही मोठा फायदा होतो. जर भारत आणि पाकिस्तानमधील सामना १५ फेब्रुवारी रोजी झाला नाही तर स्टेकहोल्डर्सना मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं.

ब्रॉडकास्टर्सचंही कोट्यवधींचं होणार नुकसान

पाकिस्तान सरकारने १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केलीये. जर पाकिस्तान आपल्या निर्णयावर ठाम राहिला तर लाखो डॉलर्सचे उत्पन्न कमी होणार आहे. सामना न झाल्यास आयसीसीच्या तिजोरीला आणि भारतीय मीडिया ब्रॉडकास्टर जिओस्टारलाही मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं.

जिओस्टार आधीच आयसीसीसोबतच्या ३ अब्ज डॉलर्सच्या करारावर पुन्हा चर्चा व्हावी याच्या प्रयत्नात आहे. या प्रमुख सामन्यातून होस्ट ब्रॉडकास्टरला २०० ते २५० कोटी रुपयांच्या जाहिरातींचं उत्पन्न कमी होऊ शकतं. या सामन्यादरम्यान १० सेकंदांच्या जाहिरातीची किंमत ४० लाखांपर्यंत असल्याची माहिती आहे.

पीसीबीला होऊ शकतो दंड

जर पाकिस्तानने भारताविरुद्धच्या सामना खेळला नाही तर तर वॉकओव्हर झाल्यास भारताला पूर्ण गुण मिळतील. परंतु पीसीबीवर आर्थिक दंड आकारण्याचा पूर्ण अधिकार आयसीसीकडे असणार आहे.

आयसीसी आणि पीसीबीचे माजी कम्युनिकेशन्स प्रमुख समी-उल-हसन बर्नी यांनी म्हटलंय की, बंदी किंवा तोट्याचा विचार केला तर मी म्हटल्याप्रमाणे, एका सामन्याचा खर्च $250 दशलक्ष आहे. पाकिस्तानचं वार्षिक उत्पन्न $35.5 दशलक्ष आहे. त्यामुळे पाकिस्तानला मोठं नुकसान सहन करावं लागू शकतं. जर आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर दंड ठोठावला तर ते पाकिस्तानी क्रिकेट उद्ध्वस्त होऊ शकतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : मेव्हण्याच्या घरात भावोजीचा दरोडा; खबऱ्याची टीप अन् तिथंच बिंग फुटलं, राष्ट्रीय खेळाडूसह ७ जण सापळ्यात अडकले

रायगडमध्ये ट्रेकिंगदरम्यान मोठी दुर्घटना; इर्शाळगडाच्या दरीत पडून तरुणाचा मृत्यू

Maharashtra News Live Update: खेड तालुक्यात भेसळयुक्त मँगो पल्प प्रकरण; ‘फ्रुट जिहाद’ पोस्टमुळे खळबळ

Ashok Kharat: अशोक खरातच्या घरात ई़डी, आलिशान कारसह मालमत्ताही होणार जप्त

IPL मध्ये मोठी उलथापालथ; अचानक वेळापत्रकात मोठा बदल, ऐनवेळी ठिकाणच बदलले, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT