viral video twitter
Sports

भर मैदानात २ खेळाडूंची समोरासमोर धडक! दोघांनाही न्यावं लागलं रुग्णालयात , पाहा VIDEO

Big Bash League: बिग बॅश लीग स्पर्धेत मोठा अपघात घडल्याचे पाहायला मिळाले आहे. २ खेळाडू एकमेकांना धडकल्यामुळे दोघांनाही रुग्णालयात न्यावं लागलं आहे.

Ankush Dhavre

क्रिकेटमध्ये आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी खेळाडू पूर्ण जोर लावताना दिसून येत असतात. फलंदाज चौकार षटकार मारून संघाला विजय मिळवून देण्याच्या प्रयत्नात असतो. गोलंदाज विकेट्स काढून, तर क्षेत्ररक्षक कुठलाही झेल पकडायच्या तयारीत असतो. या प्रयत्नात काही दुर्घटनाही होत असतात.

अशीच काहीशी दुर्घटना बिग बॅश लीग स्पर्धेत झाल्याचे पाहायला मिळाले आहे. एक झेल टिपण्यासाठी २ खेळाडूंमध्ये जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की, दोघांनाही रुग्णालयात भरती करावं लागलं आहे. या धडकेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

दोन खेळाडूंमध्ये जोरदार धडक

तर झाले असे की, बिग बॅश लीग स्पर्धेत पर्थ स्कॉर्चर्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. याच सामन्यात ही धक्कादायक घटना घडली. डॅनियल सॅम्स आणि कॅमरून बॅनक्राफ्ट यांच्यात झालेली ही धडक इतकी जोरदार होती की, दोघांनाही रुग्णालयात भरती करावं लागलं. हे दोन्ही खेळाडू सुखरूप आहेत.

या दोघांची धडक झाल्यानंतर मैदानात एकच गोंधळ पाहायला मिळाला. या घटनेनंतर सामना काही मिनिटं थांबवण्यात आला. फिजिओ धावत मैदानात आले. मात्र त्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. रुग्णालयात नेल्यानंतर दोघांची प्रकृती स्थिर असून, दोघेही एकमेकांशी चर्चा करताना दिसून आले.

केव्हा घडली घटना?

ही घटना लॉकी फर्ग्युसन गोलंदाजी करत असताना घडली. त्यावेळी कूपर कॉनोली फलंदाजी करत होता. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर कॉनोलीने मिडविकेटच्या वरून फ्लीक शॉट मारला. चेंडू हवेत जाताच डॅनियल सॅम्स आणि कॅमरून बॅनक्राफ्ट झेल टिपण्यासाठी धावले. दोघांचीही नजर वर हवेत होती. त्यामुळे दोघांनीही एकमेकांना पाहिलं नाही. हा सामना सिडनी थंडर्सने ४ गडी राखून आपल्या नावावर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raghav Juyal : आर्यन खानच्या चित्रपटाने राघव जुयाल झाला मालामाल, ५ मजली आलिशान बंगला बांधतोय

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Jio Cheapest Recharge: मोबाईल डेटा संपतोय लवकर? जिओचे ५० रुपयांखालील डेटा प्लॅन ठरतील बेस्ट पर्याय

IND vs AUS : कोहली-रोहितची आज अग्निपरीक्षा, पर्थमध्ये पहिला वनडे, वाचा प्लेईंग ११ अन् सर्वकाही

Success Story: रिलस्टार ते डेप्युटी कलेक्टर! दुसऱ्या प्रयत्नात केली MPPSC क्रॅक; हर्षिता दवे यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT