IND vs AUS, 5th Test: जशास तसं; बुमराह- सिराजपुढे ऑस्ट्रेलिया ढेपाळली; भारताकडे आघाडी

India vs Australia 5th Test, Day 2: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सिडनी कसोटीत भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले आहे.
IND vs AUS, 5th Test: जशास तसं; बुमराह- सिराजपुढे ऑस्ट्रेलिया ढेपाळली; भारताकडे आघाडी
team indiatwitter
Published On

सिडनीच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा कसोटी सामना सुरु आहे. .या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव १८५ धावांवर आटोपला होता. या धावांचा बचाव करताना भारतीय गोलंदाजांनी संघाला दमदार कमबॅक करुन दिलं. ऑस्ट्रेलियाचा डाव १८१ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने पहिल्या डावात ४ धावांची आघाडी घेतली आहे.

IND vs AUS, 5th Test: जशास तसं; बुमराह- सिराजपुढे ऑस्ट्रेलिया ढेपाळली; भारताकडे आघाडी
IND vs AUS 5th Test Day 1: टीम इंडियाचा १८५ धावांवर पॅकअप! बुमराह बॅटिंगमध्येही चमकला

भारतीय गोलंदाजांचं दमदार कमबॅक

भारतीय संघाने या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना, १८५ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियाला लवकरात लवकर ऑलआऊट करायचं आव्हान होतं. जसप्रीत बुमराहने उस्मान ख्वाजाला बाद करत संघाला दमदार सुरुवात करुन दिली. उस्मान ख्वाजा २ धावा करत माघारी परतला.

IND vs AUS, 5th Test: जशास तसं; बुमराह- सिराजपुढे ऑस्ट्रेलिया ढेपाळली; भारताकडे आघाडी
IND vs AUS: नॉर्मल वाटलोय का.. कॉन्टास पुन्हा एकदा नडला, मग बुमराहने पुढच्याच बॉलवर असा काढला राग - VIDEO

त्यानंतर सॅम कॉन्टास २३ धावांवर माघारी परतला. ऑस्ट्रेलियाकडून पहिलाच सामना खेळत असलेला ब्यू वेबस्टर या डावात चमकला. त्याने या डावात ५७ धावांची खेळी केली. तर स्टीव्ह स्मिथने ३३ धावांची खेळी केली. शेवटी अॅलेक्स कॅरीने २१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १८१ धावांवर आटोपला.

IND vs AUS, 5th Test: जशास तसं; बुमराह- सिराजपुढे ऑस्ट्रेलिया ढेपाळली; भारताकडे आघाडी
IND vs AUS: Snicko की जय हो..! आधी राहुल, जयस्वाल अन् आता सुंदर; आऊट नसतानाही जावं लागलं बाहेर?

भारतीय गोलंदाजांची दमदार कामगिरी

या सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला मोठा धक्का बसला. कारण जसप्रीत बुमराहला स्कॅनसाठी जावं लागलं. त्यासाठी त्याला मैदान सोडावं लागलं. या डावात गोलंदाजी करताना त्याने १० षटकात ३३ धावा खर्च करत २ गडी बाद केले.

भारतीय संघाकडूव गोलंदाजी करताना मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर बुमराहच्या अनुपस्थितीत नितीश कुमार रेड्डीने २ गडी बाद केले. या दमदार गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाचा डाव १८१ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने ४ धावांची आघाडी घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com