भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळळ्या जाणाऱ्या ३ एकदिवशीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना बुधवारी होणार आहे. हा तिसरा सामना राजकोटमध्ये दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सुरू होईल. भारत-ऑस्ट्रेलियाच्या तिसऱ्या एकदिवशीय सामन्याच्या आधी सर्वात मोठी अपडेट हाती आलीय. (Latest Sports News)
माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, या तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया सर्वात मोठा प्रयोग करणार आहे. भारतीय संघ अष्टपैलू हार्दिक पांड्यासह सलामीवीर शुबमन गिल, जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी, शार्दुल ठाकुर आणि अक्षर पटेल हे प्लेइंग ११ चा भाग राहणार नाहीत. यामुळे भारतीय संघ तिसरा एकदिवशीय सामना कसा जिंकेल असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हे खेळाडू नसतील
या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यांमध्ये हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल हे प्लेइंग ११ चा भाग नव्हते. यामुळे असं मानले जात होते की, राजकोट येथील एकदिवसीय सामन्यासाठी हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेलची भारतीय प्लेइंग ११ मध्ये वापसी होऊ शकते. हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांच्याशिवाय सलामीवीर शुभमन गिल, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर हे तिसर्या वनडेमध्ये खेळणार होणार नाहीत.
इंदूर येथे झालेल्या वनडेत शुबमन गिलने शानदार शतक झळकावले होते. या सामन्यात शुबमन गिलने ९७ चेंडूत १०४ धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ६ चौकार आणि ६ षटकार मारले होते. परंतु हाती आलेल्या माहितीनुसार टीम इंडियाच्या प्लेइंग ११ मध्ये शुबमन गिल, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूरसह हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेलदेखील नसणार आहेत.
मालिका भारताच्या खिश्यात
थेट पाच दर्जेदार खेळांडूना खाली बसवल्यानंतर भारतीय संघ तिसरा एकदिवशीय सामना कसा जिंकेल असा प्रश्न केला जात आहे. दरम्यान भारतीय संघासाठी चांगली गोष्ट म्हणजे ३ सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियानं २-० अशी आघाडी घेतलीय. तिसर्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला तरी केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारतानं मालिका जिंकलेली आहे. मोहालीमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा ५ गडी राखून पराभव केला होता. यानंतर इंदूरमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा ९९ धावांनी पराभव केला.
रोहित शर्मानं काय सांगितलं कारण
याविषयी रोहित शर्मानं पत्रकार परिषदेत सांगितलं की, आशिया कपच्या सामन्यांमध्ये अक्षर पटेल जखमी झाला होता. तो अजून त्या जखमेतून सावरतोय. तर गिलला आराम मिळावा यासाठी त्याला बाकावर बसवण्यात आलंय. आमचे बहुतेक खेळांडू आजारी पडले आहेत, तर अनेकांचे वैयक्तिक समस्या आहेत, त्यामुळे ते घरी गेले आहेत. तर काही खेळाडूंना आराम दिला जात आहे. या सद्यस्थितीला संघात १३ खेळाडू आहेत. सध्या संघातील खेळाडूंना साथीच्या आजारांनी ग्रासले आहे. त्यामुळे आम्हीही काही करू शकत नाही.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.