भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सचिन तेंडुलकर यांच्या शतकांच्या विक्रमाजवळ आहे. सचिन तेंडुलकर यांनी आंतरराष्ट्रीय सामन्यात १०० शतक पूर्ण केलेत. तर विराट कोहलीने ७७ शतके पूर्ण केली आहेत. कोहली काही सामन्यांमध्ये सचिनचा विक्रम मोडू शकतो. तुम्हाला माहितीये वाचक मित्रांनो, विराटला टक्कर देण्यासाठी टीम इंडियामध्ये अजून एक सव्वाशेर खेळाडू आहे. तो दुसरा कोणी नाही तर तो आहे शुबमन गिल. (Latest Sport News)
दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिले २ सामने जिंकून भारताने अजेय आघाडी घेतलीय. यात भारतीय संघाचा सलामीवीर शुबमन गिलनं मागील एका वर्षभरात जबरदस्त कामगिरी केलीय. आशिया कपमध्ये शतक ठोकणाऱ्या या धडाकेबाज फलंदाजानं दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही शतक झळकावले.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात स्फोटक फलंदाजी करणाऱ्या शुभमन गिलनं विराट कोहली, गौतम गंभीर आणि शिखर धवनसारख्या दिग्गजांना मागे पाडलंय. विराट हा सचिन तेंडुलकर यांचा शतकांचा विक्रम तोडण्यामागे लागलाय. याचदरम्यान गिलनं त्याचा एक विक्रम तोडलाय. विराटच्या नावावर जलदगतीने ६ एकदिवशीय सामन्यात शतकं करण्याचा विक्रम होता. हा विक्रम शुबमन गिलनं तोडलाय.
सर्वात वेगवान शतके बनवण्याचा विक्रम
एकदिवशीय सामन्यात शुबमन गिलचा जलवा दिसत आहे. शुबमन गिलनं भारताकडून खेळताना सर्वात जलदगतीनं ६ शतक बनवल्याचा विक्रम केलाय. दरम्यान टीम इंडियाच्या बाहेर असलेल्या शिखर धवननं ४६ एकदिवशीय सामन्यानंतर ६ शतकं केली. तर शुबमननं फक्त ३५ सामन्यांच्या डावात हा टप्पा गाठलाय. केएल राहुलला हा टप्पा गाठण्यासाठी ५३ सामने खेळावी लागली आहेत. तर विराट कोहलीनं ६ शतकं करण्यासाठी ६१ सामने खेळले आहेत.
गिलनं ३२ सामन्यांमध्ये १९१७ धाव्या केल्या आहेत. न्युझीलँडविरुद्धात खेळलेल्या सामन्यात २०८ धावा केल्या होत्या. ही त्याची आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या आहे. गिलनं एकदिवशीय सामन्यातील सरासरी ६६.१० असून १०२ च्या स्ट्रइक रेटनुसार त्याने या धावा केल्या आहेत. गिलनं या खेळ प्रकारात ६ शतकं आणि ९ अर्धशतकं केली आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.