Sports

Asian Hockey Champions Trophy 2024 : टीम इंडियाने पांचव्यांदा जिंकली आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी

Asian Hockey Champions Trophy 2024 : टीम इंडियाने चीनच्या संघाचा अंतिम सामन्यात पराभव केलाय.

Bharat Jadhav

आज आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारताने चीनच्या संघाला पराभूत करत पाचव्यांदा ट्रॉफी जिंकलीय. भारतीय संघाने उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती. आज भारताची चीनशी सामना होता. पाकिस्तानला हरवून चीनने फायनलमध्ये प्रवेश केला होता.

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जबरदस्त रोमांच पाहायला मिळाला. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या या सामन्यात पहिल्यांदाच फायनलमध्ये धडक देणाऱ्या चीननं भारताला झुंजवलं, पण हार मानेल तो भारतीय संघ कसला. एकजुटीचं बळ दाखवत भारतीय संघानं चीनला शेवटपर्यंत अक्षरशः लोळवलं. सुरुवातीच्या तीन क्वार्टर्सपर्यंत भारत आणि चीन या दोन्ही संघांमध्ये जोरदार संघर्ष बघायला मिळाला. या काळात दोन्ही संघांना गोल डागता आला नाही. पण अखेरच्या क्वार्टरमध्ये सामन्याचा रंगच बदलला आणि भारतानं १-० ने आघाडी घेत विजय मिळवून जेतेपदाला गवसणी घातली.

भारतीय संघ यापूर्वी चार वेळा चॅम्पियन ठरला होता. तर चीन पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचला होता. भारतीय संघ सहज चीनवर मात करेल असं वाटलं होतं. पण पहिल्या तीन क्वार्टरपर्यंत कोणत्याही संघाला गोल डागता आला नाही. पहिला क्वार्टर तर गोलरहित ठरला. त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीलाच कर्णधार हरमनप्रीत सिंहनं गोल डागण्याचा प्रयत्न केला. पण थोडक्यात हुकला.

चीननं झुंज देत भारताला तिसऱ्या क्वार्टरमध्येही गोल डागू दिला नाही. मात्र, शेवटपर्यंत लढण्याची आणि जिंकण्याची ताकद ठेवणाऱ्या भारतीय संघानं चौथ्या आणि अखेरच्या क्वार्टरमध्ये चमकदार कामगिरी केली. हरमनप्रीत आणि जुगराज सिंहच्या सॉलिड खेळीनं भारताला १-० ने आघाडी मिळवून दिली.

उत्कंठा...हृदयाचे ठोके चुकवणारी ती ९ मिनिटे

भारत आणि चीन या दोन्ही संघांत जबरदस्त चुरस बघायला मिळाली. अखेरची काही मिनिटे शिल्लक असतानाही सगळ्यांचाच श्वास रोखला होता. नेहमीच जादुई खेळ करून भारताला विजय मिळवून देणारा हरमनप्रीत नाही तर डिफेंडर जुगराज यावेळी धावून आला. त्यानं चीनच्या गोलकीपरच्या चारही दिशेला असलेल्या खेळाडूंना चुकवून बुलेटच्या वेगानं गोल डागला. भारतासाठी हाच गोल निर्णायक ठरला. त्यानंतर सावध खेळी करत संघानं पाचव्यांदा जेतेपदावर नाव कोरलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

नवऱ्याने जिंकली १२ कोटी रुपयांची लॉटरी, नंतर लाईव्ह स्ट्रीमवर महिलांवर उडवले सगळे पैसे; बायकोने थेट...

Maharashtra Live News Update : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंढरपूरचा चंद्रभागातीर...

SCROLL FOR NEXT