Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकर चमकला! एकाच सामन्यात घेतल्या 9 विकेट्स; टीम इंडियात संधी मिळणार?

Arjun Tendulkar Took 9 Wickets: भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने शानदार कामगिरी करत ९ गडी बाद केले आहेत.
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकर चमकला! एकाच सामन्यात घेतल्या 9 विकेट्स; टीम इंडियात संधी मिळणार?
arjun tendulkartwitter
Published On

Arjun Tendulkar Took 9 wickets For Goa: आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी यावेळी मेगा ऑक्शन होणार आहे. या मेगा ऑक्शनला काही महिने शिल्लक असताना मुंबई इंडियन्सचा गोलंदाज अर्जुन तेंडुलकरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये राडा घातला आहे.

त्याने कर्नाटक क्रिकेट असोसिएशन इन्व्हीटेशन टुर्नामेंटमध्ये आपल्या धारदार गोलंदाजीने फलंदाजांना धाराशाई केलं आहे. या स्पर्धेत तो गोवा संघाचं प्रतिनिधित्व करतोय. दरम्यान या संघाकडून खेळताना त्याने कर्नाटक संघातील ९ गडी बाद केले आहेत.

आयपीएल ऑक्शनआधी शानदार कामगिरी केल्यामुळे, त्याच्यावर मोठी बोली लागू शकते, अशी चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. या दमदार गोलंदाजीच्या बळावर गोवा संघाने हा सामना मोठ्या फरकाने जिंकला आहे. या सामन्यात कर्नाटकला १ डाव आणि १८९ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकर चमकला! एकाच सामन्यात घेतल्या 9 विकेट्स; टीम इंडियात संधी मिळणार?
IND vs BAN: पहिल्या कसोटीत रोहित या Playing XI सह मैदानात उतरणार; स्टार खेळाडूला बसवणार

या सामन्यातील पहिल्या डावात गोलंदाजी करताना अवघ्या ४५ धावा करत ५ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली. त्यानंतर दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना त्याने ४६ धावा खर्च करत ४ गडी बाद केले. अशाप्रकारे त्याने दोन्ही डावात मिळून ९ गडी बाद केले. येत्या काही दिवसात सर्व फ्रेंचायझी आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करतील. मात्र अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे की, मुंबई इंडियन्सचा संघ अर्जुन तेंडुलकरला रिलीज करू शकतो.

Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकर चमकला! एकाच सामन्यात घेतल्या 9 विकेट्स; टीम इंडियात संधी मिळणार?
IND vs BAN: 'आम्ही जिंकण्यासाठी काहीही..', बांगलादेशच्या कर्णधाराची टीम इंडियाला वॉर्निंग

आयपीएल २०२४ स्पर्धेत हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळताना अर्जुन तेंडुलकरला एकमेव सामना खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यात तो महागडा गोलंदाज ठरला होता. त्यानंतर त्याला दुखापतीमुळे मैदान सोडावं लागलं. आयपीएल २०२३ स्पर्धेत त्याला पदार्पण करण्याची संधी दिली गेली. या हंगामात त्याने ५ सामन्यांमध्ये ३ गडी बाद केले. त्याला आयपीएल मध्ये कौतुकास्पद अशी कामगिरी करता आलेली नाही. मात्र देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीच्या बळावर त्याच्यावर मोठी बोली लागू शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com