IPL 2025 स्पर्धेतील सर्वात मोठा उलटफेर! CSK या 3 दिग्गजांवर नजर

IPL 2025 Mega Auction: आयपीएल २०२४ स्पर्धेपूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. दरम्यान या ऑक्शनमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा संघ ३ खेळाडूंवर बोली लावू शकतो.
IPL 2025 स्पर्धेतील सर्वात मोठा उलटफेर! CSK या 3 दिग्गजांवर नजर
rohit sharma with kl rahultwitter
Published On

आयपीएल २०२४ स्पर्धेपूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. या मेगा ऑक्शनमध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळणार आहेत. आगाी हंगामात काही असे संघ देखील आहेत. जे नवीन कर्णधारांसह मैदानात उतरू शकतात. ज्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघाचा समावेश आहे.

केएल राहुल आणि रिषभ पंत आपल्या संघाची साथ सोडून जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. तसेच मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मा देखील मुंबई इंडियन्सला रामराम करण्याची चिन्ह आहेत. दरम्यान ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणारा चेन्नई सुपर किंग्जचा संघ या ३ खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी जोर लावताना दिसून येऊ शकतो.

रोहित शर्मा-

रोहित शर्माने आयपीएल २०१३ स्पर्धेपासून मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व केलं. यादरम्यान त्याने मुंबई इंडियन्सला ५ वेळस चॅम्पियन बनवलं. मात्र आयपीएल २०२४ स्पर्धेत हार्दिक पंड्या संघात येताच रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे रोहित नाराज असल्याचंही म्हटलं जात होतं. जर रोहितने आगामी हंगामातून माघार घेतली, तर कुठलाही संघ त्याच्यावर रेकॉर्डब्रेक बोली लावायला तयार असेल. ज्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाचाही समावेश आहे.

IPL 2025 स्पर्धेतील सर्वात मोठा उलटफेर! CSK या 3 दिग्गजांवर नजर
IPL फ्रेंचायझींवर सायबर अटॅकचं संकट! या 2 संघाचे ट्वीटर अकाऊंट हॅक

रिषभ पंत -

रिषभ पंतने आयपीएल २०२४ स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाचं नेतृत्व केलं. आगामी हंगामापूर्वी अशी चर्चा सुरु आहे की, रिषभ पंत दिल्ली कॅपिटल्स संघाची साथ सोडू शकतो. असं झाल्यास चेन्नई सुपर किंग्जचा संघ या संधीचा फायदा घेऊ शकतो. कारण चेन्नई सुपर किंग्जला एमएस धोनीनंतर कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाजाची गरज आहे. त्यामुळे रिषभ पंत परफेक्ट ऑप्शन ठरु शकतो.

IPL 2025 स्पर्धेतील सर्वात मोठा उलटफेर! CSK या 3 दिग्गजांवर नजर
IPL 2024 CSK vs RCB Match: आरसीबीच्या कार्तिक आणि रावतची दमदार खेळी; चेन्नईसमोर विजयासाठी 174 धावांचं आव्हान

केएल राहुल-

केएल राहुलला नेतृत्वाचा चांगलाच अनुभव आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेत केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्स संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता. दरम्यान गेल्या हंगामात लखनऊचे संघमालक संजीव गोयंक यांच्यात वाद झाला होता. त्यामुळे केएल राहुल आपल्या संघाची साथ सोडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com