IPL फ्रेंचायझींवर सायबर अटॅकचं संकट! या 2 संघाचे ट्वीटर अकाऊंट हॅक

IPL Teams Twitter Account Hack: आयपीएल स्पर्धेतील प्रसिद्ध फ्रेंचायझींवर सायबर अटॅक झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
IPL फ्रेंचायझींवर सायबर अटॅकचं संकट! या 2 संघाचे ट्वीटर अकाऊंट हॅक
iplcanva
Published On

आयपीएल स्पर्धेतील फ्रेंचायझींचे टेन्शन वाढले आहे. कारण आधी दिल्ली कॅपिटल्स त्यानंतर राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सायबर हल्ला झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे दोन्ही फ्रेंचायझींचा चांगलाच गोंधळ उडाला. दोन्ही संघांच ट्वीटर अकाऊंट हॅक झाल्यानंतर असे काही ट्वीट करण्यात आले, जे व्हायरल होताच फॅन्सलाही आश्चर्याचा धक्का बसला.

IPL फ्रेंचायझींवर सायबर अटॅकचं संकट! या 2 संघाचे ट्वीटर अकाऊंट हॅक
IPL 2025 मध्ये सूर्यकुमार सोडणार मुंबईची साथ; Mr. ३६०डिग्री 'या' संघाकडून दाखवणार जलवा

राजस्थान रॉयल्स संघाचं अकाऊंट हॅक

राजस्थान रॉयल्स संघाचं अकाऊंट हॅक झाल्यानंतर क्रिप्टो करन्सी संबधित काही ट्वीट करण्यात आले. या अकाऊंटवर यापूर्वी अशा पोस्ट कधीच शेअर करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे पोस्ट व्हायरल होताच, फॅन्सला अंदाज आला की, अकाऊंट हॅक करण्यात आलं आहे. यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाचं अकाऊंट हॅक झाल्यानंतरही असेच काहीसे पोस्ट शेअर करण्यात आले होते.

मिलियन फॉलोवर्स असलेले अकाऊंट हॅक झाल्यामुळे सायबर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अशा घटना घडल्यामुळे फॅन्सची गुपित माहिती लीक होण्याचीही भिती वर्तवली जात आहे. आता फ्रेचांयझी अशा गोष्टी पुन्हा घडू नये, यासाठी काय पाऊल उचलणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

IPL फ्रेंचायझींवर सायबर अटॅकचं संकट! या 2 संघाचे ट्वीटर अकाऊंट हॅक
IPL 2025: मुंबई इंडियन्स कोणत्या २ खेळाडूंना नारळ देणार? ६ पैकी ४ जण निवडण्याचा पेच

आयपीएल २०२५ स्पर्धेला सुरु व्हायला अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी डिसेंबर महिन्यात मेगा ऑक्शनचा थरार रंगणार आहे. यावेळी काही स्टार खेळाडूंवर रेकॉर्डब्रेक बोली लागू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

आयपीएलचे नियम बदलणार?

काही दिवसांपूर्वी बीसीसीआय आणि आयपीएल संघमालक यांच्यात महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. ज्यात रिटेन खेळाडूंच्या नियमाबाबत चर्चा झाली. आतापर्यंत फ्रेचांयझींना ४ खेळाडूंना रिटेन करण्याची अनुमती दिली गेली आहे. मात्र फ्रेचांयझींनी ६ खेळाडूंना रिटेन करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. आता बीसीसीआय काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com