IPL 2025 मध्ये सूर्यकुमार सोडणार मुंबईची साथ; Mr. ३६०डिग्री 'या' संघाकडून दाखवणार जलवा

IPL 2025, Suryakumar Yadav: IPL 2025 बाबत अनेक आश्चर्यकारक बातम्या समोर आल्या आहेत. आता बातमी आली आहे सूर्यकुमार यादव आयपीएल २०२५ मध्ये दुसऱ्या संघाकडून खेळताना दिसणार आहे.
IPL 2025 मध्ये सूर्यकुमार सोडणार मुंबईची साथ; Mr. ३६०डिग्री 'या' संघाकडून दाखवणार जलवा
IPL 2025, Suryakumar Yadav
Published On

इंडियन प्रीमियर लीगचे १८ वा हंगाम म्हणजेच आयपीएल २०२५ बाबत अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. आयपीएल २०२५ मध्ये अनेक बदल पाहण्यास मिळणार आहेत. मेगा ऑक्शननंतरच खऱ्या गोष्टी समोर येणार आहेत, पण हा लिलाव अद्याप झाला नाहीये. दरम्यान या लीगमधील सर्व संघांना ४ खेळाडू कायम ठेवता येणार येईल, तर बाकी खेळाडूंना रिलीज करावे लागणार आहे. यात मुंबई इंडियन्स संघातूनही अनेक खेळाडू रिलीज होणार आहेत.

आयपीएलच्या नव्या हंगामाविषयी विविध चर्चा कानावर येत आहेत. या चर्चांमध्ये आरसीबी संघाबाबत एकही चर्चा कानावर येत आहे. ही चर्चा म्हणजे आरसीबी संघ आता नव्या कर्णधाराच्या शोधात असून ते फाफ डु प्लेसिससला रिलीज करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संघ व्यवस्थापन मंडळ एखाद्या भारतीय खेळाडूच्या शोधात असून जो संघाची जबाबदारी संभाळून शकेल. तसेच संघाला आयपीएलीची ट्रॉफी मिळवून दईल.

IPL 2025 मध्ये सूर्यकुमार सोडणार मुंबईची साथ; Mr. ३६०डिग्री 'या' संघाकडून दाखवणार जलवा
IND vs BAN: केएल राहुलची सुट्टी, रिषभ पंतचं कमबॅक! बांगलादेशविरुद्ध या खेळाडूंना मिळू शकते संधी

यासर्वं चर्चांमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघातील मिस्टर ३६० ,सूर्यकुमार यादवचं नाव चर्चेत आहे.मिळालेल्या मिहितीनुसार, बेंगळुरू संघाचे सूर्यकुमार यादवला आपल्या संघात घेऊ इच्छित आहे. आरसीबीला सूर्यकुमारला आपल्या संघाचं कर्णधार बनवायचं आहे,असं सांगितलं जात आहे. या खेळाडूसाठी मुंबई इंडियन्सला कितीही रक्कम देण्यास फ्रेंचायझी तयार आहे. आयपीएलच्या नियमांनुसार, सर्व संघ मेगा लिलावापूर्वी प्रत्येकी चार खेळाडूंना कायम ठेवू शकतात.

उर्वरित सर्व खेळाडूंना संघांना सोडावे लागेल. याशिवाय लिलावापूर्वी संघ आपापसात व्यापारही करू शकतात. यामध्ये खेळाडूंची देवाणघेवाण होते. एक संघ दुसऱ्या संघाला खेळाडू घेण्यासाठी पैसे देतो. आरसीबीला सूर्यकुमार हवा असेल तर मुंबईशी व्यापार करू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएल २०२५ मध्ये संघांना रिटेन केलेल्या खेळाडूंच्या संघात वाढ केली गेली पाहिजे, पण बीसीसीआय यासाठी तयार नाहीये.

आयपीएल २०२५ साठी बीसीसीआय आणि सर्व संघांनी ४ रिटने करण्यासह अजून २ खेळाडूंना रिटेन करण्यास परवानगी द्या अशी मागणी सर्व संघाकडून केली जाते. दरम्यान दोन खेळाडू आरटीएम करणयास मान्यता मिळालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com