Ind vs Wi saam tv
Sports

Ind vs Wi: टीम इंडियाचा उपकर्णधार बदलला; अनुभवी खेळाडूंकडे जबाबदारी, वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी 15 शिलेदार निवडले

India Squad For WI Test Series: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी (West Indies Tour) भारतीय संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यासाठी निवड समितीने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, तो म्हणजे टीम इंडियाचा उपकर्णधार (Team India Vice-Captain) बदलण्याचा.

Surabhi Jayashree Jagdish

भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान 2 टेस्ट सामन्यांची सीरीज पुढच्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरपासून होणार आहे. पहिली टेस्ट 2 ऑक्टोबरपासून अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होईल, तर दुसरी टेस्ट 10 ऑक्टोबरला दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळवली जाणार आहे. या सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.

रविंद्र जडेजावर मोठी जबाबदारी

भारताने या सीरीजसाठी टीम जाहीर केली आहे. रवींद्र जडेजाला उपकर्णधा म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. याशिवाय देवदत्त पडिक्कलची टीममध्ये कमबॅक झालं आहे. तर इंग्लंड दौऱ्यावर खेळलेला करुण नायर याला टीममधून वगळण्यात आलं आहे.

वेस्ट इंडीजच्या विरुद्ध 15 सदस्यीय टेस्ट टीम जाहीर

करुण नायरला या सीरीजसाठी संधी मिळणार नाही, ही आधीच शक्यता व्यक्त केली जात होती. इंग्लंड दौऱ्यावर त्याची कामगिरी खास ठरली नव्हती. त्यामुळे त्याला यावेळी टीममधून वगळण्यात आलं आहे.

अजीत अगरकर यांची प्रतिक्रिया

टीम इंडियाचे चीफ सिलेक्टर अजीत अगरकर यांनी करुण नायरच्या निवडीबाबत मोठं विधान केलं आहे. त्यांनी सांगितले, “आम्हाला करुण नायरकडून अधिक अपेक्षा होत्या. फक्त एक डाव पुरेसा नसतो. पडिक्कल सध्या चांगली कामगिरी करतोय. आम्हाला सर्व खेळाडूंना 15-20 संधी द्यायच्या असतात, परंतु या परिस्थितीत ते शक्य नाही.”

सुमारे आठ वर्षांनंतर करुण नायरला इंग्लंड दौऱ्यात टेस्ट खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र त्याची कामगिरी समाधानकारक ठरली नाही. त्यामुळे त्याला वेस्ट इंडीजविरुद्धच्या सिरीजसाठी टीममध्ये स्थान मिळालेलं नाही. त्याचबरोबर अक्षर पटेलचं टीममध्ये कमबॅक झालं आहे. इंग्लंड दौऱ्यावर तो टीममध्ये नव्हता. तसेच देवदत्त पडिक्कल देखील टीममध्ये परत आला आहे.

कशी आहे टीम इंडिया

शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जायसवाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नीतीश कुमार रेड्डी, एन जगदीशन (विकेटकीपर), मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव

भारत विरुद्ध वेस्ट इंडीज टेस्ट सिरीज 2025 वेळापत्रक

  • पहिला टेस्ट सामना : 2 ते 6 ऑक्टोबर, अहमदाबाद – नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम

  • दुसरा टेस्ट सामना : 10 ते 14 ऑक्टोबर, दिल्ली – अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम

दोन्ही सामने भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता सुरू होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय मुलाचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांकडून रास्ता रोको करत फोडल्या गाड्या

Election Commission: निवडणुकांपूर्वी मतमोजणीच्या नियमात मोठा बदल; EVMच्या आधी पोस्टल बॅलेटची होणार मोजणी

IND vs WI: भारताच्या पाच खेळाडूंची कसोटी कारकीर्द संपुष्टात! विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी संघाच्या घोषणेतून स्पष्ट संकेत

Maharashtra Live News Update: बीडमध्ये उद्धव ठाकरेंचा पाहणी दौरा; शेतकऱ्यांचा संवाद

Beed Rain : बीडला अतिवृष्टीचा तडाखा, तब्बल चार एकर जमीन गेली वाहून| VIDEO

SCROLL FOR NEXT