आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने मंगळवारी (३० एप्रिल) १५ मुख्य आणि ४ राखीव खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. या संघाची घोषणा झाल्यानंतर यष्टीरक्षक म्हणून सलामीवीर म्हणून कोणाला स्थान मिळणार,हे प्रश्न तर सुटले आहेत. मात्र काही असे खेळाडू देखील होते, ज्यांना या संघात स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं, मात्र या खेळाडूंना या संघात स्थान मिळू शकलेलं नाही. कोण आहेत ते ११ खेळाडू? जाणून घ्या.
शुभमन गिल...
भारतीय संघातील युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिलचा या संघात राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्याला मुख्य संघात स्थान देण्यात आलेलं नाही. मात्र त्याची गेल्या काही सामन्यातील कामगिरी पाहीली, तर त्याला संघात स्थान मिळायला हवं होतं. या स्पर्धेतील १० सामन्यांमध्ये त्याने ३२० धावा केल्या आहेत.
अभिषेक शर्मा ..
सनरायझर्स हैदाराबाद संघाकडून खेळणारा अभिषेक शर्मा सलामीला फलंदाजीला येऊन शानदार कामगिरी करतोय. या हंगांमातील ९ सामन्यांमध्ये त्याने ३०३ धावा केल्या आहेत.
ऋतुराज गायकवाड...
चेन्नई सुपर किंग्ज संघाचं नेतृत्व करत असलेल्या ऋतुराज गायकवाडने देखील या हंगामात शानदार खेळ करुन दाखवला आहे. त्याने या हंगामातील ९ सामन्यांमध्ये ४४७ धावा केल्या आहेत. तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. मात्र तरीदेखील त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं नाही.
केएल राहुल..
केएल राहुल हा भारतीय संघातील अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज आहे. त्याला संघात स्थान मिळण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. मात्र तरीदेखील त्याला संघात स्थान देण्यात आलेलं नाही.
तिलक वर्मा...
मुंबईचा मध्यक्रमातील फलंदाज तिलक वर्मा देखील शानदार कामगिरी करतोय. तो मध्यक्रमात फलंदाजी करण्यासाठी परफेक्ट ऑप्शन होता. मात्र तरीदेखील त्याला संघात स्थान देण्यात आलेलं नाही.
इशान किशन
मुंबईचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनला देखील या संघात स्थान देण्यात आलेलं नाही. इशानने मुंबई इंडिनन्स संघासाठी डावाची सुरुवात करताना त्याने संघाला चांगली सुरुवात करुन दिली आहे.
रिंकू सिंग
रिंकू सिंग भारतीय संघात टी-२० वर्ल्डकप खेळण्यासाठी वेस्टइंडीजला जाणार. मात्र त्याचा मुख्य संघात समावेश करण्यात आलेला नाही. त्याचा राखीव खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे.
क्रृणाल पंड्या
अष्टपैलू खेळाडू सध्या आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. त्याचा न निवडलेल्या प्लेइंग ११ मध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे.
टी नटराजन..
टी नटराजन आयपीएल २०२४ स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघाचं प्रतिनिधित्व करतोय. टी-२० वर्ल्डकपसाठी त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. न निवडण्यात आलेल्या संघात टी नटराजनचाही समावेश आहे.
संदीप शर्मा...
संदीप शर्मा देखील सध्या चांगली कामगिरी करतोय. त्याला भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. मात्र त्याला त्याच्याकडेही दुर्लक्ष करण्यात आलं आहे.
आवेश खान
भारताचा मध्यमगती गोलंदाज आवेश खानचा राखीव खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे .त्याने टी-२० वर्ल्डकपसाठी न निवडलेल्या संघात वेगवान गोलंदाज म्हणून स्थान मिळवलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.