World Test Championship च्या अंतिम सामन्याचे यजमानपद मिळावे अशी इच्छा व्यक्त केली होती. पण भारताला यजमानपद मिळणार नसल्याचे म्हटले जात आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पुढील तीन आवृत्त्यांचे यजमानपद इंग्लंडकडे देण्याचा निर्णय आयसीसीने केल्याचे म्हटले जात आहे. जुलै २०२५ मध्ये आयसीसीच्या वार्षिक परिषदेमध्ये याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल असे म्हटले जात आहे.
आतापर्यंत इंग्लंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या मागील तीन आवृत्त्यांचे यजमानपद भूषवले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ३ अंतिम सामन्याचे आयोजन इंग्लंडने केले आहे. यातील तिसरा सामना सध्या इंग्लंडमधील लोकप्रिय लॉर्ड्स स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ आमने सामने आले आहे.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) यांच्यात एक करार होणार असल्याचे म्हटले जात आहे. या करारानुसार, २०३१ पर्यंतच्या पुढील तीन आवृत्त्यांसाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे यजमानपद भूषवण्याची इंग्लंडला परवानगी मिळणार आहे. जुलै २०२५ मध्ये होणाऱ्या वार्षिक परिषदेत इंग्लंडच्या यजमानपदाच्या निर्णयाबद्दलची अधिकृत घोषणा होईल असे द टेलिग्राफच्या अहवालामध्ये म्हटले आहे.
ECB ला यजमानपदाबाबत ICC कडून परवानगी मिळाली आहे. भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या यजमानपद मिळण्याबाबत इच्छा व्यक्त केली होती. आयसीसीच्या बैठकांमध्ये यावर चर्चा देखील झाली होती. पण विविध कारणांमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे अंतिम सामने इंग्लंडमध्ये व्हावेत असा आयसीसीचा निर्णय झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.