Yuzvendra Chahal saam tv news
Sports

Team India News: टी-२० मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा टीम इंडियाचा हा स्टार गोलंदाज निवृत्ती घेणार? संघात स्थान मिळणं झालय कठीण

Yuzvendra Chahal: अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत रोहितसह विराट कोहली देखील कमबॅक करताना दिसून येणार आहे. दरम्यान भारतीय संघात एक असा खेळाडू आहे ज्याला सतत दुर्लक्ष केलं जातंय.

Ankush Dhavre

Yuzvendra Chahal News:

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ लवकरच अफगाणिस्तान संघाविरुद्ध दोन हात करताना दिसून येणार आहे. येत्या ११ जानेवारीपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ टी -२० सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेत रोहितसह विराट कोहली देखील कमबॅक करताना दिसून येणार आहे. दरम्यान भारतीय संघात एक असा खेळाडू आहे ज्याला सतत दुर्लक्ष केलं जातंय.

भारतीय संघातील अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहलला सतत दुर्लक्ष केलं जातंय. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी -२० मालिकेसाठी त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे त्याला टी -२० वर्ल्डकप स्पर्धेसाठीच्या संघातही स्थान मिळणार नाही असा अंदाज व्यक्त केला जातोय. चहलने भारतीय संघासाठी टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद केले आहेत. मात्र सतत दुर्लक्ष केलं जात असताना, त्याचं टी -२० करियर संपलंय का? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. (Latest sports updates)

या खेळाडूला मिळाली संधी..

बीसीसीआयने नुकताच अफगाणिस्तानविरूद्धच्या टी -२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात रवी बिश्नोईला स्थान देण्यात आलं आहे. रवी बिश्नोईसह कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदरला देखील या संघात स्थान दिलं गेलं आहे.

चहलला २०२३ मध्ये वेस्टइंडीज विरुद्धच्या मालिकेत खेळण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर भारतात वनडे वर्ल्डकप स्पर्धा रंगली. या स्पर्धेतही त्याला स्थान दिलं गेलं नाही. त्यांनतर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये टी -२० मालिका पार पडली. या मालिकेसाठीही त्याला संघात स्थान दिलं गेलं नाही.

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये वनडे आणि टी -२० सामन्यांची मालिका पार पडली. त्याला वनडे मालिकेतून वगळण्यात आलं. या मालिकेतही त्याला स्थान दिलं गेलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Ayushman Bharat: ५ लाख नाही तर १० लाखांपर्यंत मोफत उपचार; कोणत्या कुटुंबांना होणार फायदा? वाचा सविस्तर माहिती

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, मेट्रोचं जाळं विस्तारणार; 31 किमी लांबीच्या २ मार्गिका अन् २८ स्थानके

निवडणुकीत पैसे वाटण्यासाठी रवींद्र चव्हाणांच्या मार्फत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात 25 लाख रुपये, आमदार राणेंचा खळबळजनक आरोप|VIDEO

SCROLL FOR NEXT