mohammed shami twitter
Sports

IND vs ENG: १४ महिन्यांनंतर भारताचा स्टार खेळाडू संघात परतला; मॉर्केलने मिठी मारत केलं स्वागत ; पाहा VIDEO

Mohammed Shami Comeback: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या सामन्यासाठी स्टार गोलंदाज मैदानात परतला आहे.

Ankush Dhavre

भारतीय गोलंदाजी आक्रमण आणखी बळकट होणार आहे. कारण गेल्या १४ वर्षांपासून ज्या गोलंदाजाची आतुरतेने वाट पाहिली जात होती. तो गोलंदाज आता संघात परतला आहे. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला संघाबाहेर व्हावं लागलं होतं.

त्याने काही महिने NCA मध्ये कसून सराव केला आणि आता तो कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या मालिकेसाठी शमीचा भारतीय टी-२० संघात समावेश करण्यात आला आहे.

संघासोबत सरावाला सुरुवात

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेतील पहिला टी-२० सामना कोलाकातातील ईडन गार्डन्सच्या मैदानावर होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय खेळाडू कोलकात्याला पोहोचले आहेत.

ज्यावेळी भारतीय खेळाडू ईडन गार्डन्समध्ये सरावासाठी जात होते, त्यावेळी साऱ्यांच्या नजरा मोहम्मद शमीवर होत्या. बीसीसीआयने शमीचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया हँडेलवर शेअर केला आहे.

बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मोहम्मद शमी आणि युवा अष्टपैलू खेळडू नितीश कुमार रेड्डी बसमध्ये जाताना दिसून येत आहेत. त्यानंतर मैदानात प्रवेश करताना दिसून येत आहेत.

शमीला मैदानात परतल्याचं पाहून गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्कलला चांगलाच आनंद झाल्याचं पाहायला मिळालं आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवि बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक).

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar: मागच्या आणि आताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT