indian cricket team AP
क्रीडा

Team India News: T-20 WC नंतर विराट, रोहितला विश्रांती, तर झिम्बाब्वे दौऱ्यासाठी या युवा खेळाडूंना मिळू शकते संधी

Team India Squad For Zimbabwe Tour: भारतीय संघ टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेनंतर झिम्बाब्वे दौऱ्यावर रवाना होणार आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघ सध्या टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा खेळण्यात व्यस्त आहे. साखळी फेरीतील शानदार कामगिरीनंतर भारतीय संघाने सुपर ८ मध्ये प्रवेश मिळवला आहे. ही स्पर्धा अमेरिका आणि वेस्टइंडिज मध्ये सुरू आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर रवाना होणार आहे.

या दौऱ्यावर भारत आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. माध्यमातील वृत्तानुसार, येणाऱ्या आठवड्यात झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड केली जाऊ शकते. याच मालिकेतून गौतम गंभीर भारतीय संघाचा हेड कोच म्हणून पदार्पण करू शकतो. दरम्यान कोणत्या खेळाडूंना संधी मिळू शकते? जाणून घ्या.

माध्यमातील वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला आहे. भारतीय संघ टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेच्या दृष्टीने संघ बांधणी करायला सुरुवात करणार आहे. त्यामुळे आयपीएल २०२४ स्पर्धेत शानदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना भारतीय संघात संधी दिली जाऊ शकते. मात्र याबाबत अधिकृतरित्या कुठलंही स्पष्टीकरण आलेलं नाही. मुख्य निवडकर्ते अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांच्यात चर्चा झाल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल.

सध्या भारतीय संघाची जबाबदारी कर्णधार रोहित शर्माकडे आहे. तर हार्दिक पंड्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजासारखे वरिष्ठ खेळाडू सध्या टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा खेळण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे या खेळाडूंना टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेनंतर विश्रांती दिली जाऊ शकते.

त्यामुळे भारतीय संघाचा कर्णधार कोण होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भारतीय संघाची जबाबदारी ऋतुराज गायकवाडकडे सोपवली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तर आयपीएल २०२४ स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी करणाऱ्यांसाठी भारतीय संघाचं दार उघडं केलं जाऊ शकतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Pickle: आवळ्याचे लोणचे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे, जाणून घ्या कारणे...

Maharashtra Election Result : 'महायुतीचे सरकार बनण्यामागे लाडक्या बहिणींचा मोठा हात'

Sanjay Raut Press Conference : हा जनतेचा कौल नाही, हे निकाल अदानींनी लावून घेतलेत; संजय राऊत बरसले

Vidhan Sabha Election Result : कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष; मतदारसंघातून अमल महाडिकांचा विजय निश्चित

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंना मोठा धक्का; चंद्रकांत पाटील आघाडीवर

SCROLL FOR NEXT