team india squad for t20 world cup 2024 on the basis of ipl 2024 performance amd2000 twitter
Sports

T20 World Cup 2024: अभिषेक -पराग ते दुबे अन् मयांक! IPL कामगिरीच्या आधारे निवड झाल्यास T-20 WC साठी अशी असेल टीम इंडिया

Team India For T20 World Cup 2024: आयपीएल २०२४ स्पर्धा झाल्यानंतर टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धा वेस्टइंडिज आणि अमेरिकेत होणार आहे.

Ankush Dhavre

Team India For T20 World Cup 2024:

आयपीएल २०२४ स्पर्धेत आतापर्यंत २१ सामने खेळले गेले आहेत. या स्पर्धेत विराट , रोहितसारख्या खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आहे. यासह काही युवा खेळाडू देखील आहेत ज्यांनी शानदार खेळ करुन दाखवला आहे. ज्यात मयांक यादव, अभिषेक शर्मा आणि रियान पराग यांचा समावेश आहे.

आयपीएल २०२४ स्पर्धा झाल्यानंतर टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी देखी संकेत दिले आहेत की, आयपीएल स्पर्धेत शानदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघात स्थान दिलं जाईल. जर खरंच आयपीएल स्पर्धेतील कामगिरीच्या बळावर भारतीय संघाची निवड केली गेली,तर कोणाला संधी मिळू शकते? जाणून घ्या.

या खेळाडूंना मिळणार संधी?

या हंगामात शानदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अभिषेक शर्मा अव्वल स्थानी आहे. सलामीला फलंदाजीला येत अभिषेक शर्माने शानदार खेळ करुन दाखवला आहे. त्यानंतर मध्यक्रमात फलंदाजी करताना रियान परागने शानदार खेळ करुन दाखवला आहे.

फिनिशर म्हणून शिवम दुबे, रिंकू सिंग आणि साई सुदर्शनने तुफान फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले आहे. आयपीएल स्पर्धेतील कामगिरी पाहून गोलंदाजांची निवड करायचं झालं, तर युझवेंद्र चहल, आर अश्विन, मोहित शर्मा ,जसप्रीत बुमराह, खलील अहमद आणि मयांक यादव यांनी शानदार गोलंदाजी केली आहे. (Cricket news in marathi)

संघातील मुख्य फलंदाजांचा फ्लॉप शो..

आयपीएल २०२४ स्पर्धेत भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंना नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, कुलदीप यादव, इशान किशन, केएल राहुल यांना मोठी खेळी करता आलेली नाही. ही स्पर्धेतील बरेच सामने शिल्लक आहेत. त्यामुळे हे प्रमुख खेळाडू कमबॅक करताना दिसून येऊ शकतात. आयपीएल स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात भारतीय संघाची निवड केली जाणार आहे. या संघात कोणाला स्थान मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

आयपीएल स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर निवडल्यास असा असेल भारतीय संघ

रोहित शर्मा, अभिषेक शर्मा, विराट कोहली, रियान पराग, शिवम दुबे, रिंकू सिंग, साई सुदर्शन, दिनेश कार्तिक, राहुल तेवतिया, युजवेंद्र चहल, आर अश्विन, मोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, खलील अहमद आणि मयांक यादव.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT