team india saam tv
Sports

Team India Squad For Asia Cup 2023: आशिया चषक तोंडावर असूनही संघाची घोषणा करण्यात उशीर का होतोय? हे आहे प्रमुख कारण

Asia Cup 2023: केव्हा होणार भारतीय संघाची घोषणा? जाणून घ्या.

Ankush Dhavre

Team India Asia Cup 2023:

आशिया चषक २०२३ स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस राहिले आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान विरूद्ध नेपाळ या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तान आणि नेपाळ संघाची घोषणा करण्यात आली आहे.

बांगलादेशने देखील या स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली आहे. मात्र भारतीय संघाची घोषणा अजुनही व्हायची आहे.

माध्यमातील वृत्तानुसार येत्या २० ऑगस्ट रोजी भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते. मात्र भारतीय संघाची घोषणा होण्यात उशीर का होतोय? काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या.

आशिया चषक स्पर्धेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. झी न्यूजच्या वृत्तानुसार बीसीसीआय २० ऑगस्ट रोजी भारतीय संघाची घोषणा करणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ संघाची घोषणा करण्यात आली आहे.

जसप्रीत बुमराहमुळे भारतीय संघाची घोषणा करण्यात उशीर होतोय असं म्हटलं जात आहे. २० ऑगस्ट रोजी भारत विरूद्ध आयर्लंड याच्यांतील ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना असणार आहे. जर तो फीट असेल तर त्याला आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान दिले जाऊ शकते.

जसप्रीत बुमराह हा भारतीय संघातील स्टार खेळाडू आहे. सप्टेंबर २०२२ रोजी तो दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला होता. त्याची दुखापत इतकी गंभीर होती की त्याच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली होती. १८ ऑगस्टपासून भारत विरूद्ध आयर्लंड यांच्यातील ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेतून जसप्रीत बुमराह कमबॅक करताना दिसून येणार आहे. तसेच रोहित शर्माच्या अनुपस्थितीत त्याला भारतीय संघाचे कर्णधारपद देण्यात आली आहे. (Latest sports updates)

आयर्लंडविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ :

जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Train: लोकल सेवा विस्कळीत; गाड्या २५ ते ३० मिनिटे उशिरा, VIDEO

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र सदनाचे बांधकाम करणारे चमणकर बंधू दोषमुक्त

Daytime Sleepiness Risks: दिवसा झोप काढताय? सावधान! होऊ शकतो 'हा' जीवघेणा आजार

Asia Cup 2025: आशिया कपमध्ये फूलऑन ड्रामा; PCBची धमकी, ICCचा नकार, पाकिस्तान संघाचं काय होणार?

Maharashtra Government: सरकारच्या तिजोरीवर लोकप्रिय योजनांचा ताण; महाराष्ट्राच्या डोक्यावर ९ लाख कोटींचं कर्ज

SCROLL FOR NEXT