team india yandex
Sports

India vs Bangladesh T20I Series: टी२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; सूर्यकुमारकडे कर्णधारपदाची जबाबदारी, संघात कोणाला मिळाली संधी? वाचा

Team india squad announced for T20I series :बांगलादेशविरोधात टी२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.

Vishal Gangurde

मुंबई : बांगलादेश विरोधात सुरु असलेल्या कसोटी मालिकेनंतर टी२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. बीसीसीआयने या मालिकेसाठी सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. १५ खेळाडूंच्या संघाची बीसीसीआयने शनिवारी उशिरा रात्री घोषणा केली.

बांगलादेश विरोधातील टी २० मालिकेसाठी संघात दोन नव्या खेळाडूंना संघात स्थान मिळालं आहे. तर एका गोलंदाजाला ३ वर्षानंतर भारतीय संघात स्थान मिळालं आहे. मात्र, संघात ईशान किशनला स्थान मिळालं नाही. त्यामुळे त्याला टीम इंडियात पदार्पण करण्यासाठी आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे.

आयपीएलमध्ये फलंदाजांची झोप उडवणारा जलद गोलंदाज मयंक यादवला संघात पहिल्यांदा स्थान मिळालं आहे. तर अष्टपैलू नीतीश कुमार रेड्डी याला देखील पहिल्यांदा संघात स्थान मिळालं आहे.

भारत आणि बांगलादेशमध्ये ६ ऑक्टोबरपासून टी२० सामन्यांची मालिका सामने सुरु होणार आहे. या मालिकेत ३ सामने होणार आहेत. या मालिकेसाठी भारताचा टी२० संघ दोन महिन्यांनी मैदानात उतरणार आहे. याआधी भारतीय टी२० संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी गौतम गंभीरकडे प्रशिक्षकपद आणि सूर्यकुमार यादवकडे कर्णधार पदाची धुरा होती. त्याच मालिकेतील काही खेळाडूंना पुन्हा संधी मिळाली आहे. तर शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराजला संघात स्थान मिळालं नाही. ते कसोटी मालिकेत खेळत असल्याने त्यांना विश्रांती देण्यात आल्याचं समजतंय.

मयंक यादवला संधी

आयपीएलमध्ये जलद गोलंदाजीने फलदांजी झोप उडवणाऱ्या मयंक यादवला भारतीय संघात पहिल्यांदा स्थान मिळालंय. दिल्लीत राहणाऱ्या २२ वर्षीय जलद गोलंदाज मयंकने आयपीएलमध्ये १५० किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने गोलंदाजी केली होती. त्याने या आधी १५५.८ केएमपीएच वेगानेही गोलंदाजी केली आहे. त्यानंतर पुढील सामन्यात त्याने १५६.७ kmph वेगाने गोलंदाजी केली होती. मयंकने ४ सामने खेळले होते. ४ सामन्यात त्याने ७ गडी बाद केले हेते. त्यानंतर एका सामन्यात दुखापतग्रस्त झाल्याने त्याला स्पर्धेला मुकावं लागलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT