sunil gavaskar  saam tv
Sports

Sunil Gavaskar On KL Rahul: 'तो चांगला खेळाडू आहे, पण..'गावसकरांनी टीम इंडियाच्या स्टार खेळाडूला धरलं धारेवर

Sunil Gavaskar Statement: सुनील गावसकरांनी भारतीय संघाच्या स्टार खेळाडूबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

Ankush Dhavre

Sunil Gavaskar Statement On KL Rahul:

भारतीय संघातील यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुलला आशिय चषक २०२३ स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान दिलं गेलं आहे. मात्र अजूनही पूर्णपणे फिट होऊ न शकल्याने तो सुरुवातीच्या २ सामन्यांमधून बाहेर राहणार आहे.

भारतीय संघ आपला पहिला सामना पाकिस्तान संघाविरूद्ध खेळणार आहे. या सामन्यात केएल राहुल खेळताना दिसून येणार नाही. दरम्यान निवडकर्त्यांनी आता केएल राहुलचा पर्याय शोधावा असा सल्ला सुनील गावसकर यांनी दिला आहे.

सुनील गावसकर यांनी स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हटले की, 'मला असे वाटते की, तो गेला नाही कारण, त्याला त्याच फिजिओबरोबर उपचार सुरू ठेवायचे आहेत जे NCA मध्ये त्याला पाहत होते. तो ५ सप्टेंबरपूर्वी कुठलाच सामना खेळणार नाही. मग तुम्ही त्याच्या परिस्थितीचे मुल्यांकन कसे करणार आहात? सराव सामने आणि मॅच फिटनेस ही पुर्णपणे वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, निवड समितीसाठी निर्णय घेणं कठीण असेल.'

सुनील गावसकरांचं स्पष्ट मत आहे की, निवडकर्त्यांनी केएल राहुलच्या पुढे जाऊन विचार करायला हवा. याबाबत बोलताना ते म्हणाले की, 'तो दर्जेदार खेळाडू आहे, मात्र सामन्यात असं होत नसेल तर अडचणी वाढू शकतात.

याचं उत्तर तुम्हाला सुरुवातीच्या २ सामन्यांमध्ये मिळू शकतं, अशा परिस्थितीत तुम्हाला केएल राहुलच्या पर्यायी खेळाडूचा विचार करावा लागेल. हे निराशाजनक असेल, मात्र हे सत्य आहे.' (Latest sports updates)

'तुम्ही त्याच्याबाबत रिस्क घेऊ शकत नाही. मी देखील त्याला संघात घेण्याच्या बाजूने आहे. कारण सत्य हे आहे की, तो दर्जेदार खेळाडू आहे. जर वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी तो सामना खेळण्यासाठी फिट नसेल तर मला असं वाटतं की, त्याला स्वत:ला वर्ल्डकपच्या संघात ठेवणं कठीण होईल.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सातपुड्यातील सर्वात उंच शिखरावर होणाऱ्या अस्तंबा यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Rahul Gandhi : निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत इंडिया आघाडीचा 'महामोर्चा', नजर फिरेल तिथपर्यंत आंदोलक, पाहा व्हिडीओ

Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण सुरुवात कशी करणार? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप सोप्या टिप्स

Fact Check : महाराष्ट्रातील रेशन कार्डधारकांना ९००० रुपये मिळणार, सुनेत्रा पवारांच्या नावाने मेसेज व्हायरल, सत्य आलं समोर

Bank Fraud : बँक खात्यातून अचानक पैसे गायब झाले? घाबरू नका! RBI च्या नियमांनुसार मिळू शकतो पूर्ण रिफंड

SCROLL FOR NEXT