WTC Scenario After IND vs NZ 2nd Test: पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. सलग दुसऱ्या पराभवासह भारतीय संघाने कसोटी मालिका २-० ने गमावली आहे.
या पराभवानंतर भारतीय संघाचं टेन्शन वाढलं आहे. कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. कसं असेल भारतीय संघासाठी फायनलमध्ये जाण्याचं समीकरण? समजून घ्या.
भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. मात्र सलग २ पराभवांनंतर भारतीय संघाचा फायनलमध्ये जाण्याचा मार्ग खडतर झाला आहे.
भारतीय संघाला मुंबईतील वानखेडे स्टेडियवर होणाऱ्या सामन्यात कुठल्याही परिस्थितीत विजय मिळवावाच लागणार आहे. ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघाला फायनलमध्ये जाण्यासाठी ही मालिका कुठल्याही परिस्थितीत ३-२ ने जिंकावी लागणार आहे.
भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील सुरुवातीचे २ सामने गमावले असले तरीदेखील भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी कायम आहे. भारतीय संघाची विजयाची सरासरी ६२.८ इतकी आहे.
तर ऑस्ट्रेलियाची विजयाची सरासरी ही ६२.५ वर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियालाही फायनलमध्ये जाण्याची संधी आहे. यासह श्रीलंकेचा संघ फायनलमध्ये जाण्याची प्रबळ दावेदार आहे. श्रीलंकेची विजयाची सरासरी ५५.६ इतकी आहे.
भारताला सलग दुसऱ्या सामन्यात पराभूत केल्यानंतर न्यूझीलंडची सरासरी ५०.० वर जाऊन पोहोचली आहे. या विजयासह न्यूझीलंडचा संघ चौथ्या स्थानी पोहोचला आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ पाचव्या स्थानी सरकला आहे. ४०.८ टक्के विजयाच्या सरासरीसह इंग्लंडचा संघ सहाव्या स्थानी आहे.
तर ३३.३ टक्के सरासरीसह पाकिस्तानचा संघ सातव्या, ३०.६ टक्के सरासरीसह बांगलादेशचा संघ आठव्या आणि १८.५ टक्के विजयाच्या सरासरीसह वेस्टइंडीजचा संघ सर्वात शेवटी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.