India vs pakistan  Saam tv
Sports

India VS Pakistan : टीम इंडियाने पाकिस्तानचा उडवला धुव्वा; रचला 'हा' मोठा इतिहास

टीम इंडियाने महिलांच्या टी२० विश्वचषक स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी धावांचा पाठलाग करण्याचा मोठा विक्रम केला.

Vishal Gangurde

India VS Pakistan News : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२३ स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना झाला. या अतितटीच्या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी जोरदार खेळ दाखवत ७ गडी राखून सामना खिशात टाकला. यावेळी टीम इंडियाने महिलांच्या टी२० विश्वचषक स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी धावांचा पाठलाग करण्याचा मोठा विक्रम केला. (Latest Marathi News)

आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत टीम पाकिस्तानने भारताला जिंकण्यासाठी १५० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत टीम इंडियाने (Team India) विजय मिळवला. टीम इंडियाच्या शेफाली वर्माने ३३ धावांची खेळी केली.

जेमिमा रॉड्रिग्जने नाबाद ५३ धावांची खेळी केली. तर रिचा घोषने ३१ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. पाकिस्तानच्या (Pakistan) १५० धावांचा यशस्वी पाठलाग करत महिलांच्या टी२० विश्वचषक स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी धावांचा पाठलाग करण्याचा इतिहास रचला.

पाकिस्तान संघाने दिले होते १५० धावांचे आव्हान

टीम पाकिस्तानकडून फलंदाजी करताना जावेरिया खान ८ तर मुनीबा अली १२ धावा करत माघारी परतली. त्यानंतर कर्णधार बिस्मा मारूफने जबाबदारी स्वीकारत फलंदाजी केली. तिने या डावात नाबाद ६८ धावा केल्या.

तर आयशा नसीमने ४३ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. या खेळीच्या जोरावर पाकिस्तान संघाला २० षटक अखेर ४ गडी बाद १४९ धावा केल्या.

तर भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना, राधा यादवने २१ धावा खर्च करत २ गडी बाद केले. तर दिप्ती शर्मा आणि पूजा वस्त्रकारने प्रत्येकी १-१ गडी बाद केला.

अशी होती दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारत- शेफाली वर्मा, यस्तिका भाटिया, जेमिमा रॉड्रिग्स, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष(विकेटकिपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकार, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका ठाकूर सिंग

पाकिस्तान – जावेरिया खान, मुनीबा अली (विकेटकिपर), बिस्मा मारूफ (कर्णधार), निदा दार, सिद्रा अमीन, आलिया रियाझ, आयशा नसीम, ​​फातिमा सना, आयमान अन्वर, नशरा संधू, सादिया इक्बाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan 2025 : श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरु होतोय?

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, CM फडणवीसांनी दिलं मोठं गिफ्ट

‘गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है’; शिवसेनेच्या बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडावर भक्तांनी घेतले विठुरायाचे दर्शन

SCROLL FOR NEXT