shubman gill and shreyas iyer yandex
Sports

Team India Playing 11: दुसऱ्या कसोटीतून अय्यर- गिल बाहेर? विराटच्या भिडूंना मिळणार पदार्पणाची संधी; अशी असेल प्लेइंग ११

Team India Playing 11 For IND vs ENG 2nd Test: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये दुसरा कसोटी सामना विशाखापट्टनमच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११

Ankush Dhavre

IND vs ENG 2nd Test:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला २८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवासह भारतीय संघ ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे.

मालिकेतील दुसरा कसोटी सामना येत्या २ फेब्रुवारीपासून विशाखापट्टनमच्या मैदानावर रंगणार आहे. या कसोटी सामन्यासाठी संघाची प्लेइंग ११ निवडणं हे रोहित शर्मासाठी मुळीच सोपं नसणार आहे.

संघातील प्रमुख खेळाडू बाहेर..

इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेत भारतीय संघाला मोठे धक्के बसले आहेत. मालिका सुरु होण्यापूर्वीच मोहम्मद शमी फिट नसल्यामुळे मालिकेतून बाहेर झाला. तर विराट कोहलीने वैयक्तिक कारणास्तव मालिकेतील सुरुवातीच्या २ सामन्यांमधून माघार घेतली.

आता पहिल्या कसोटीत पराभव झाल्यानंतर संघातील प्रमुख फलंदाज केएल राहुल आणि अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर झाले आहेत. हे फॉर्मात असलेले खेळाडू बाहेर होणं भारतीय संघासाठी मोठा धक्का आहे.

तर दुसरीकडे श्रेयस अय्यर आणि शुभमन गिलला सतत संधी मिळूनही दोघेही फ्लॉप ठरत आहेत. स्वत: रोहित शर्मा धावा करताना संघर्ष करताना दिसून येत आहे.त्यामुळे दुसऱ्या कसोटीत सामन्यात काही मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. (Cricket news in marathi)

या सामन्यात गिल किंवा अय्यरपैकी एकाला बाहेर बसावं लागु शकतं. असं झाल्यास सरफराज खान आणि रजत पाटीदार दोघांनाही पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. मात्र हे होणं जरा कठीण आहे. गिल किंवा अय्यरपैकी एकालाही बाहेर बसावं लागलं तरीदेखील सरफराज किंवा पाटीदारपैकी एकाची लॉटरी लागु शकते.

दुसऱ्या कसोटीसाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल/रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, सरफराज खान/रजत पाटीदार, केएस भरत (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर/कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

SCROLL FOR NEXT