team india saam tv
Sports

Team India Playing 11: पहिल्या कसोटीत 'या' 3 खेळाडूंचं नशीब उजळणार! पंत सारखाच आक्रमक खेळाडू करणार पदार्पण

IND vs WI: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ स्पर्धा सुरू होताच भारतीय संघाने नव्या संघ बांधणीला सुरुवात केली आहे.

Ankush Dhavre

Team India Prediction: भारत आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ १२ जुलैपासून आमने सामने येणार आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात झालेल्या पराभवानंतर पहिल्यांदाच भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.

मात्र या मालिकेत काही बदल पाहायला मिळणार आहेत. या संघातील काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देऊन युवा खेळाडूंना संघात स्थान दिलं गेलं आहे. (Team India Playing 11)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ स्पर्धा सुरू होताच भारतीय संघाने नव्या संघ बांधणीला सुरुवात केली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्मासह यशस्वी जयस्वालची जोडी मैदानात उतरू शकते. यशस्वी जयस्वालने आयपीएल २०२३ स्पर्धेत आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे.

या कामगिरीची दखल घेत त्याची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली होती. या सामन्यात रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी मैदानात उतरली होती. मात्र आता त्याला सलामीला जाण्याची संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे.

यशस्वीला संधी मिळण्याचं प्रमुख कारण असं की, चेतेश्वर पुजाराला विश्रांती दिली दिली गेली आहे. त्यामुळे शुभमन गिल पुजाराची जागा भरून काढायला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. (Latest sports updates)

भारतीय संघाला नवा यष्टिरक्षक मिळणार..

वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या मालिकेत यष्टीमागे नवा खेळाडू पाहायला मिळू शकतो. याष्टिरक्षक फलंदाज केएस भरतला आतापर्यंत ५ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. मात्र या सामन्यांमध्ये त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाही.

आता टीम मॅनेजमेंटने त्याचा पर्यायी खेळाडू शोधून काढला आहे. रिषभ पंतच्या अनुपस्थितीत आता डाव्या हाताचा आक्रमक फलंदाज ईशान किशन यष्टिरक्षकाची भूमिका बजावताना दिसून येणार आहे.

तर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजवर मोठी जबाबदारी असणार आहे. शार्दुल ठाकूर त्याला साथ देताना दिसून येऊ शकतो. तसेच संधीच्या शोधात असलेल्या जयदेव उनाडकटला दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT