Sports

IND vs SA: रायपूरमध्ये टीम इंडियाची नवी रणनीती? प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता

IND vs SA 2nd ODI: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेतील पुढील सामना रायपूरमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाने नवी रणनीती आखली असून, प्लेइंग XI मध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

Surabhi Jayashree Jagdish

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सध्या ३ सामन्यांची वनडे सिरीज सुरु असून आज दुसरा सामना खेळवण्यात येणार आहे. या सिरीजमध्ये पहिला सामना जिंकून टीम इंडिया १-० अशी आघाडी घेतली आहे. तर आज दुसरा सामना रायपूरमध्ये खेळवण्यात येणार आहे. मात्र रायपूरमध्ये होणाऱ्या दुसऱ्या सामन्यापूर्वी काही प्रश्न अजूनही उभे आहेत.

कोहलीच्या शतकासह रोहित शर्माच्या आक्रमक 57 रन्सच्या खेळीने भारताला विजय मिळवून दिला. मात्र टीमच्या कॉम्बिनेशनबाबत अजूनही थोडी चिंता कायम आहे.

कसं आहे रायपूरचं पीच?

रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह स्टेडियम आतापर्यंत फक्त एकच वनडे सामना खेळला गेलाय. हा सामना जानेवारी 2023 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळवण्यात आला होता. त्या सामन्यात मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी जबरदस्त स्विंग आणि सीम मूव्हमेंटचा फायदा घेत कीवी संघाला फक्त 108 रन्सवर रोखलं होतं. भारताने हा सामना 30 ओव्हर्स बाकी असताना आठ विकेट्स राखून जिंकला होता.

या ठिकाणी शेवटचा मोठा आंतरराष्ट्रीय सामना डिसेंबर 2023 मध्ये टी20 फॉर्मेटमध्ये झाला होता. ज्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला 20 रन्सने पराभूत केलं होतं.

भारताची प्लेइंग XI काय असेल?

सिरीजमध्ये पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतरही आजच्या सामन्यासाठी टीममध्ये काही बदल दिसण्याची शक्यता आहे. सर्वात मोठा प्रश्न ऋतुराज गायकवाडबाबत आहे. गेल्या सामन्यात त्याला चौथ्या क्रमांकावर पाठवलं होतं. पण त्याला चांगला खेळ करता आला नाही. वाशिंगटन सुंदरलाही फलंदाजी क्रमात सतत बदलांचा सामना करावा लागत आहे. पहिल्या सामन्यात तो पाचव्या क्रमांकावर आला पण मोठी खेळी करू शकले नाहीत.

गोलंदाजीमध्ये कुलदीप यादवने 68 रन्स देऊन 4 विकेट्स घेतल्या. वेगवान गोलंदाजांमध्ये हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा आणि अर्शदीप सिंह यांना आजच्या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे.

भारताची संभाव्य प्लेइंग XI

रोहित शर्मा, यशस्वी जायसवाल, विराट कोहली, रुतुराज गायकवाड, केएल राहुल, (कर्णधार), वाशिंगटन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह

दक्षिण आफ्रिकेची संभाव्य प्लेइंग XI

टेम्बा बावुमा (कर्णधार), एडेन मारक्रम, क्विंटन डी कॉक, मॅथ्यू ब्रीट्जके, टोनी डी जॉर्जी, डेवाल्ड ब्रेविस, मार्को यानसन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, नांद्रे बर्गर, ओटनील बार्टमॅन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maheshwari Saree Designs: साध्या पण दिसायला भारी महेश्वरी साड्यांची भलतीच क्रेझ, या आहेत 5 डिझाईन्स

Two New Airlines:नव्या दोन एअरलाईन्सची विमानं आकाशात भरणार उड्डाण; केंद्र सरकारची मंजुरी

'हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला'; राणांचा सल्ला, विरोधकांचा हल्ला, VIDEO

Maharashtra Politics : भाजपला रोखण्यासाठी पवार काका-पुतण्या एकत्र? सुप्रिया सुळेंनी दिले सूचक संकेत

BMC Election : शिंदेंना हव्यात तिजोरीच्या चाव्या; BMCसाठी भाजप-शिंदेसेनेमधला पेच कायम, VIDEO

SCROLL FOR NEXT