IND VS AUS WTC Final 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे. अंतिम सामन्यात भारत - ऑस्ट्रेलिया संघ आमने सामने येणार आहेत.
गतवर्षी न्यूझीलंड सोबत झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे भारतीय संघ यावेळी पूर्ण जोर लावताना दिसून येणार आहे. मात्र भारतीय संघाला या सामन्यात काही दिग्गज खेळाडूंशिवाय खेळावं लागणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतची कमतरता जाणवणार आहे. त्याची गेल्या काही वर्षातील कामगिरी पाहिली तर, तो भारतीय संघासाठी मॅचविनर ठरतोय. मात्र कार अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. तेव्हापासून तो संघाबाहेर आहे.
दिग्गज गोलंदाजाशिवाय उतरणार मैदानात..
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त असल्यामुळे संघाबाहेर आहे. बुमराह भारतीय संघातील घातक आणि प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने ३० कसोटी सामन्यांमध्ये १२८ गडी बाद केले आहेत. त्यामुळे गोलंदाजी आक्रमणात नक्कीच जसप्रीत बुमराहची कमतरता जाणवू शकते. (Latest sports updates)
केएल राहुल..
केएल राहुल देखील भारतीय संघातील प्रमुख फलंदाजांपैकी एक आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो फ्लॉप ठरत असला तरी इंग्लंडमध्ये त्याचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. आतापर्यंत खेळलेल्या ४७ कसोटी सामन्यांमध्ये त्याने ३३.४४ च्या सरासरीने २६४२ धावा केल्या आहेत.
तर इंग्लंडमध्ये खेळताना केएल राहुलने ९ कसोटी सामन्यांमध्ये ३४.११ च्या सरासरीने ६१४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ अर्धशतक आणि २ शतके झळकावली आहेत.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ :
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
राखीव खेळाडू: यशस्वी जयस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.