WTC Final: WTC जिंकण्यासाठी टीम इंडियाचा 'सिक्रेट प्लान'! चक्क कॅमेरावर घातली बंदी; काय आहे कारण?

WTC Final 2023: भारतीय संघाला दुसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे भारतीय संघातील खेळाडू यावेळी अधिकचा जोर लावताना दिसून येणार आहेत.
team india
team indiatwitter

IND VS AUS WTC Final 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना येत्या ७ ते ११ जून दरम्यान पार पडणार आहे. हा सामना लंडनमध्ये असलेल्या द ओव्हलच्या मैदानावर पार पडणार आहे. भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

स्पर्धेच्या पहिल्या हंगामात भारतीय संघाला अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

आता भारतीय संघाला दुसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे भारतीय संघातील खेळाडू यावेळी अधिकचा जोर लावताना दिसून येणार आहेत.

team india
WTC Final Records: WTC च्या अंतिम सामन्यात विराट अन् रोहितच्या नावे होणार मोठ्या विक्रमाची नोंद; एमएस धोनीला सोडणार मागे

भारतीय संघातील खेळाडूंना ओव्हलच्या मैदानावर सराव करायचा होता. मात्र या मैदानावर खेळपट्टी बनवण्याचं काम सुरु असल्याने भारतीय संघातील खेळाडूंना सराव करण्याची अनुमती दिली गेली नाही.

भारतीय संघातील खेळाडूंनी २ जून पर्यंत लंडनपासून ३ तास दूर असलेल्या अरुंडेलमध्ये सराव केला. त्यानंतर ते लंडनला रवाना झाले आहेत. ४ ते ६ जूनदरम्यान भारतीय खेळाडू ओव्हलमध्ये सराव करणार आहेत. त्यानंतर ७ जूनपासून या सामन्याला सुरुवात होणार आहेत. (Latest sports updates)

तब्बल ६ तास केला सराव..

लंडनला रवाना होण्यापूर्वी अरुंडेलमध्ये भारतीय संघातील खेळाडूंनी कसून सराव केला. हे सराव सत्र तब्बल ६ तास सुरु होते. हे सराव सत्र सुरु असताना माध्यमांना देखील प्रवेश दिला गेला नव्हता. तब्बल ६ तास सराव असताना, माध्यमातील एका व्यक्तीला प्रवेश दिला गेला नव्हता. पत्रकार विमल कुमारच्या वृत्तानुसार,भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला धूळ चारण्यासाठी सिक्रेट सराव केला आहे.

हे सराव सत्र इतके सिक्रेट ठेवण्यात आले की, माध्यमातील एकाही सदस्याला सराव सत्र पाहण्याची संधी दिली गेली नाही. असा अंदाज व्यक्त केला गेला आहे की, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने ११ खेळाडूंची निवड केली असून, हे ११ खेळाडू सामन्याच्या दृष्टीने सराव करण्यासाठी मैदानात उतरले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com