वनडे वर्ल्डकपआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
सरावसामन्यादरम्यान अरुंधती रेड्डीला दुखापत
चालता येत नसल्याने व्हीलचेअरवरुन नेलं
Team India Player Injured : महिला वनडे वर्ल्डकप २०२५ ला ३० सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच टीम इंडियाच्या महिला ब्रिगेडला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान प्रमुख खेळाडूला दुखापत झालाी आहे. बेंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स मैदानावर ही घटना घडली आहे. दुखापत इतकी गंभीर होती, की खेळाडूला व्हीलचेअरवरून मैदानाबाहेर न्यावे लागले.
भारतीय महिला क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज अरुंधती रेड्डी इंग्लंड विरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान जखमी झाली आहे. गोलंदाजी करताना रेड्डीच्या डाव्या पायाला दुखापत झाल्याचे म्हटले जात आहे. तिच्या दुखापतीच्या तीव्रतेबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. पण दुखापतीमुळे भारतीय संघाचे टेन्शन वाढले असल्याचे म्हटले जात आहे.
सराव सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रेड्डीने इंग्लंडच्या एमी जोन्सला बाद करत चमकदार कामगिरी केली. पण डावाच्या १३ व्या ओव्हरमध्ये फॉलो-थ्रू दरम्यान चेंडू थांबवण्याचा प्रयत्न करताना रेड्डी मैदानावर पडली. इंग्लंडची फलंदाज हीदर नाईटने शॉट मारल्यानंकर चेंडू थेट अरुंधती रेड्डीच्या पायावर पडला. यामुळे तिला दुखापत झाली. वेदना होत असल्याचे दिसून आले. यानंतर तिला व्हीलचेअरवरुन मैदानाबाहेर नेण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अरुंधती रेड्डीच्या दुखापतीची तीव्रतेची अपडेट अजून समोर आलेली नाही. दुखापतीबाबत बीसीसीआयने अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. पुढील चौकशीनंतर परिस्थिती स्पष्ट होईल. जर दुखापत गंभीर असेल तर त्याचा फटका भारतीय संघाला बसेल. ३० सप्टेंबरपासून महिला वनडे वर्ल्डकप सुरु होणार आहे. अशात अरुंधतीच्या दुखापतीमुळे भारताची डोकेदुखी वाढली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.